AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे तक्रार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. तशी माहिती खुद्द मुंडे यांनीच दिली आहे. इतकंच नाही तर याबाबत फेसबुकला कळवण्यात आलं आहे. तसंच सायबर सेलकडेही तक्रार केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, सायबर सेलकडे तक्रार
धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 4:04 PM
Share

मुंबई : अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक झाल्याच्या बातम्या अनेकदा तुमच्या वाचनात आल्या असतील. पण आता चक्क एका मंत्र्याचंच फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. तशी माहिती खुद्द मुंडे यांनीच दिली आहे. इतकंच नाही तर याबाबत फेसबुकला कळवण्यात आलं आहे. तसंच सायबर सेलकडेही तक्रार केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. (Dhananjay Munde’s Facebook account hacked, complaint to cyber cell)

धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय. तसंच याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दिल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.

दरम्यान, शिक्षण क्षेत्रात बीड पॅटर्न निर्माण व्हावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे केंद्र बीड जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) केंद्र देखील जिल्ह्यात सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती मुंडे यांनी 19 ऑक्टोबर रोजी दिली होती.

इतर बातम्या : 

अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही, आरोप लागले आहेत तर एनसीबीनं चौकशी करावी – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

Dhananjay Munde’s Facebook account hacked, complaint to cyber cell

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.