अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही, आरोप लागले आहेत तर एनसीबीनं चौकशी करावी – देवेंद्र फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज दादरा नगर-हवेलीत बोलत होते.

अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही, आरोप लागले आहेत तर एनसीबीनं चौकशी करावी - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 3:13 PM

दादरा नगर-हवेली : मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्याचा आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज दादरा नगर-हवेलीत बोलत होते. (Devendra Fadnavis reaction on allegations against Sameer Wankhede)

अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. जे साक्षीदार आहेत त्यांची विश्वासार्हता संपेल. अशी कारवाई झाल्यास साक्ष द्यायला पुढे कुणी येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप लागले आहेत तर एनसीबीने त्याची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे आरोप आणि इशाऱ्यावर बोलताना अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

मोदींनी गरीबांसाठीच्या योजनांना प्राधान्य दिलं

आपलं भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, दे मोदींनी देशात करुन दाखवलं. गरीबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली हे पहिलं काम मोदींनी केलं. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून एक रुपया निघतो आणि तो गरीबांच्या खात्यात जातो. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरं दिली जातील. महाराष्ट्रात 10 लाख घरं दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय. मोदींनी घर देताना, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही. आता मोदी आरोग्याची योजना गरीबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील 60 वर्षात दादरा नगर-हवेलीत पोहोचले नाहीत. ते 7 वर्षात मोदींनी पोहोचवले. आधी सत्तेच्या गल्लीत फक्त भ्रष्टाचार चालायचा. तो मोदींनी बंद केला आणि गरीबांच्या योजनांना प्राधान्य दिल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय.

इतर बातम्या :

‘समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत’, बॉलिवूडला बदनाम करण्याच्या आरोपावरुन क्रांती रेडकर पतीच्या पाठीशी

‘इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार’, नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

Devendra Fadnavis reaction on allegations against Sameer Wankhede

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.