बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, अजित पवारांचा सल्ला, घराघरातील वादाचं मूळ कारणही सांगितलं

बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका" असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, अजित पवारांचा सल्ला, घराघरातील वादाचं मूळ कारणही सांगितलं
उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, पुणे : “सद्यस्थितीत जमीन ही घराघरातील वादाचे मूळ आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका” असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या घराघरातील वादाचं मूळ हे जमीन असल्याचं सांगितलं. त्यामुळे वाद करत बसू नका, तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. नंतर त्रास होईल. त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका. असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय.

आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊसाहेबांचाच थाट असायचा. त्याकाळी काहींनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केल्याचा किस्सा यावेळी अजित पवार यांनी सांगितला.

अजित पवार-सुप्रिया सुळेंकडून सिंहगडाची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल शुक्रवारी 1 ऑक्टोबरला सिंहगडाची पाहणी केली. माझा सिंहगड माझा अभिमान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अजित पवारांनी पर्यावरणाचा विचार करून पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगडाचा विकास करण्यासाठी प्लान सांगितला. सिंहगडावर ट्राफिक होतं. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा पर्याय, आज pmpl च्या ट्रायल बसने आज आम्ही आलो. येथे वेगवेगळ्या टपऱ्या आहेत. कुणीही कशाही पद्धतीने टपऱ्या लावल्या आहेत. त्यामुळे बकालपणा आलाय, आम्हाला त्यांच्या रोजी रोटीवर परिणाम होऊ द्यायचा नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही. सध्या 71 स्टॉल्स आहेत. पण चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू, असे अजित पवार यांनी सांगितले.

7 वाजता उद्घाटन वेळ, 6.59 ला फीत कापली!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक वेळेचा अंदाज शिरुरकरांना अनुभवायला मिळाला. शिरुर नगर परिषदेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम काल 1 ऑक्टोबरला अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची असताना अजित पवारांनी बरोबर 6.59 ला फीत कापली…! उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची ठरलेली होती. पण अजित पवारांचं 6. 50 वाजताच कार्यक्रमस्थळी आगमन झालं. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने अजित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

संबंधित बातम्या  

पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका, अमोल कोल्हेंचा हुंकार

उद्घाटनाची वेळ सकाळी 7 ची, अजित पवारांनी 6.59 वाजताच फित कापली!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI