AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक नेता, एक झेंडा, एक मैदान… निष्ठेचा सागर उसळणार; शिवसेनेचा तोडीस तोड टीझर व्हायरल

उद्धव ठाकरे यांनी हा टीझर ट्विट केला आहे. त्यावर वाजत गाजत, गुलाल उधळत या... पण शिस्तीत या!, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

एक नेता, एक झेंडा, एक मैदान... निष्ठेचा सागर उसळणार; शिवसेनेचा तोडीस तोड टीझर व्हायरल
शिवसेनेचा तोडीस तोड टीझर व्हायरलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2022 | 11:49 AM
Share

मुंबई: दसरा मेळाव्याची तारीख जसजशी जवळ आली आहे, तसतशी शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटात प्रचंड चुरस वाढली आहे. प्रत्येक गटाकडून आपलाच दसरा मेळावा प्रचंड होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी दोन्ही गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी खेड्यापाड्यातून लोक आणण्यापासून वाहने बूक करण्यात येत आहेत. त्याशिवाय आपल्याच मेळाव्याला जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या आयडिया लढवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा (shinde camp) दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. शिंदे गटाच्या या टीझरला तोडीस तोड देणारा नवा टीझर शिवसेनेने व्हायरल केला आहे. या टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर फोकस ठेवण्यात आला असून जुन्या दसऱ्या मेळाव्याची क्षणचित्रेही यात दाखवण्यात आली आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत चैतन्य संचारलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा दसरा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंच प्रमुख भाषण होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

टीझरमध्ये काय?

शिवसेनेचा हा टीझर अवघ्या 35 सेकंदाचा आहे. या टीझरच्या सुरुवातीलाच भगवे झेंडे आणि शिवसेनेच्या वाघाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. या शिवाय जुन्या दसऱ्या मेळाव्याची प्रचंड गर्दी या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.

निष्ठेचा सागर

त्यानंतर या टीझरमध्ये काही वाक्य दाखवण्यात आली आहेत. निष्ठेचा सागर उसळणार. भगवा अटकेपार फडकणार. महाराष्ट्रा ताकद दिसणार, अशी वाक्य या टीझरमध्ये दिसत आहेत.

जमलेल्या माझ्या…

या टीझरमध्ये उद्धव ठाकरेंवर अधिक फोकस देण्यात आला आहे. जुन्या दसऱ्या मेळाव्याची क्षणचित्रं दाखवण्यात आली आहेत. त्या उद्धव ठाकरे लोकांना अभिवादन करत आहेत. कमरेवर हात ठेवून उभे आहेत, हात उंचावत आहेत, अशा उद्धव ठाकरे यांच्या विविध पोझ दाखवण्यात आल्या आहेत.

प्रचंड गर्दी, जल्लोष, उद्धव ठाकरेंचं अभिवादन आणि त्या पार्श्वभूमीवर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो मातांनो, अशी उद्धव ठाकरे यांनी केलेली भाषणाची सुरुवात… असं या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यातून दसरा मेळाव्याची वातावरण निर्मिती करण्यात शिवसेनेला यश आलं आहे. यानंतर ऐतिहासिक दसरा मेळावा म्हणण्यात आलं आहे.

वाजत गाजत, गुलाल उधळत…

उद्धव ठाकरे यांनी हा टीझर ट्विट केला आहे. त्यावर वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या!, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तर टीझरवर एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!, असं म्हटलं आहे.

मेळावा कधी

स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर 5 ऑक्टोबर 2022, सायं. 6.30 वा.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.