अनिल देशमुखांच्या शोधासाठी ईडीने मागितली सीबीआयची मदत, तर भाजप नेत्यांचे राज्य सरकारला सवाल

ईडी अधिकाऱ्यांना अनिल देशमुख कुठे आहेत? याचा थांगपत्ताही लागत नाही. त्यामुळे देशमुखांच्या शोधासाठी आता ईडीने केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआयची मदत मागितली आहे. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत सवाल उपस्थित केलाय.

अनिल देशमुखांच्या शोधासाठी ईडीने मागितली सीबीआयची मदत, तर भाजप नेत्यांचे राज्य सरकारला सवाल
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 9:11 PM

मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अनेकदा समन्स बजावले आहेत. असं असूनही देशमुख मात्र चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होत नाहीत. त्याचबरोबर ईडी अधिकाऱ्यांना अनिल देशमुख कुठे आहेत? याचा थांगपत्ताही लागत नाही. त्यामुळे देशमुखांच्या शोधासाठी आता ईडीने केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआयची मदत मागितली आहे. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत सवाल उपस्थित केलाय. (ED helps CBI to find Anil Deshmukh, BJP leaders question the Thackeray government)

अनिल देशमुख कुठे आहेत? असा सवाल फक्त भाजप नेते उपस्थित करत नाहीत तर ईडीनेही केलाय.100 कोटी रुपये वसुली प्रकरणात ईडीने देशमुख यांना आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. मात्र, देशमुख अजूनही ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. वारंवार समन्स बजावूनही गैरहजर राहिल्यानं देशमुखांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी आली आहे. त्यामुळे आता ईडीनं सीबीआयची मदत घेऊन देशमुखांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

अनिल देशमुख कुठे आहेत?, दरेकरांचा सवाल

‘अनिल देशमुख हे कुठे बेपत्ता आहेत, काही ठाऊक नाही. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व पोलीस आयुक्तांनी अनिल देशमुख कुठे आहेत हे सांगायला हवे. आपल्या खात्यातील माणूस कुठे आहेत, हे माहित नसणे म्हणजे नक्कीच पोलीस खात्यात काय गोधळ सुरू आहे, हे स्पष्ट होते. अनिल देशमुख कुठे आहेत हे राष्ट्रवादीने सांगावे.’ असा सवाल प्रविण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

देशमुख फरार नाही, मलिकांचा दावा

दुसरीकडे अनिल देशमुख हे आपल्या कुटुंबियांसोबत याच देशात, राज्यातच आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. तसंच देशमुख हे कुठेही फरार झालेले नाही. दरेकर आणि सोमय्या यांनी भाजपमधील फरार नेत्यांवर बोलावं, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

ईडी, सीबीआयच्या छापेमारीनंतरही देशमुख गायब!

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते. असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सीबीआयने नागपूरपासून मुंबईतील देशमुखांच्या निवासस्थानी छापे टाकले. सीबीआयच्या छापेमारीनंतर ईडीनेही देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थान, तसंच अन्य आस्थापनांवरही छापे टाकले होते. ईडीने देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पलांडेला अटक केली आहे. ते अद्यापही तुरुंगातच आहेत. दुसरीकडे देशमुख मात्र ईडीसमोर येण्यास तयार नाहीत. दरम्यान, ईडीच्या छापेमारीनंतर देशमुखांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं.

देशमुख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, ईडीसमोर चौकशीसाठी येण्यात ते टाळाटाळ करत आहेत. समन्स आल्यावर ते वकिलाद्वारे उत्तर पाठवतात. तब्येतीचं कारण सांगून ऑनलाईन चौकशी करण्याची विनंती करतात. मात्र, आता ईडीने कठोर भूमिका घेत सीबीआयच्या मदतीनं देशमुखांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

इतर बातम्या :

खोटे आरोप, मंत्र्यांना टार्गेट करणं चुकीचं; जाणीवपूर्वक बदनामी सुरु असल्याचा जयंत पाटलांचा आरोप

OBC Reservation: भुजबळ आणि वडेट्टीवार चेहरे चमकावायला आले होते, ओबीसी आरक्षणावर दानवेंचा चिमटा

ED helps CBI to find Anil Deshmukh, BJP leaders question the Thackeray government

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.