आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांशी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक

मुंबई: राष्ट्रवादीत प्रवेश केला… चार वर्षानंतर आज मन हलकं झालं… डोक्यावरचं ओझं गेलं… पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं… नाही तर मी गेलोच होतो… अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूल मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे भावूक झाले होते. (Eknath Khadse expressed his sentiments when joining ncp)

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांशी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. चार वर्षानंतर आज मन हलकं झालं. डोक्यावरचं ओझं गेलं. जयंतराव, (जयंत पाटलांना उद्देशून) ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असं सांगताना खडसे भावूक झाले होते. पवार साहेब मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. नाही तर मी गेलोच होतो. राजकीय जीवनातून उठलो असतो. भाजपने मला काहीच दिलं नसतं. त्यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेत ठेवलं असतं. तुम्ही ज्येष्ठ झालात आता मार्गदर्शन करा, असं सांगितलं असतं. ज्यांना पक्षात येऊन चार दिवस झाले नाहीत, त्यांनी मला हे सांगितलं असतं, असंही ते म्हणाले.

कुणाच्याही पाठित खंजीर खुपसला नाही

मला काही पद हवं म्हणून मी राष्ट्रवादीत आलो नाही. मला पदाचा हव्यास नाही. तर माझा भाजपमध्ये छळ झाला. मला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच मी आज राष्ट्रवादीत आलो आहे, असं ते म्हणाले. मी संघर्ष केला पण कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही. ज्येष्ठ नेते म्हणायचे आणि पाठित खंजीर खुपसायचा असं राजकारण कधी केलं नाही. बाई किंवा महिलेला समोर ठेवून तर कधीच राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. (Eknath Khadse expressed his sentiments when joining ncp)

राष्ट्रवादी वाढवणार

भाजप वाढवण्यासाठी खस्ता खालल्या. पण शेवटी हाती बदनामी आली. जेवढं काम भाजपसाठी निष्ठेनं केलं. तेवढंच काम राष्ट्रवादीसाठी करेल. जशी भाजप वाढवली तसाच राष्ट्रवादीचा विस्तार करेल. आणि मी ते करून दाखवेन. अरुण गुजराथींनाही ते माहीत आहे. फक्त मला तुमची साथ हवी. पाठिशी कोणी उभे असेल तर मी कुणाला घाबरत नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

कुल्फी, चॉकलेट मिळावं म्हणून चंद्रकांतदादा भाजपमध्ये आले; खडसेंचं प्रत्युत्तर

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच चंद्रकांतदादांची टीका; खडसे-पाटील जुंपली

BLOG – राष्ट्रवादीत खडसेंचाही ‘राणे’ तर होणार नाही ना?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI