AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुल्फी, चॉकलेट मिळावं म्हणून चंद्रकांतदादा भाजपमध्ये आले; खडसेंचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. खडसेंना आता कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी? तेच पाहायचं आहे, या पाटील यांच्या टीकेचा खडसेंनी समाचार घेतला आहे.

कुल्फी, चॉकलेट मिळावं म्हणून चंद्रकांतदादा भाजपमध्ये आले; खडसेंचं प्रत्युत्तर
| Updated on: Oct 23, 2020 | 7:06 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. खडसेंना आता कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी? तेच पाहायचं आहे, या पाटील यांच्या टीकेचा खडसेंनी समाचार घेतला आहे. चंद्रकांतदादा, तुमचा भाजपशी संबंध काय? तुमचं योगदान काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपमध्ये आलात, अशी टीका खडसे यांनी केली. (Eknath Khadse reaction on Chandrakant Patils statement)

‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. भाजपनं मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी माझं 40 वर्षाचं आयुष्य भाजपला दिलं आहे. मला फुकट मिळालं नाही. मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला. तुम्हाला सर्व फुकट मिळालं, अशी टीका करतानाच कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवालही त्यांनी केला.

भाजपमध्ये माझा छळ झाला. माझी बदनामी झाली. म्हणून मी पक्ष सोडला. काही मिळविण्यासाठी पक्ष सोडला नाही, असंही त्यांनी सांगितलं. माझा भूखंडाशी काहीही संबंध नसताना माझी चौकशी करण्यात आली. आता माझ्याकडे काही लोकांच्या भूखंड गैरव्यवहाराचे कागदपत्रं आहेत. त्याच्या चौकशीची मागणी करणार. गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात पुराव्याशिवाय मी कोणतेही आरोप केले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

2 वाजताचा प्रवेश 4 वाजेपर्यंत का लांबला हे जयंत पाटलांनी सांगावं. तुमच्याकडेही अजून त्यांना काय द्यायचं हे ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ अशावर शेवटी नाथा भाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही समाधान होतं. त्यामुळे आता त्यांना तो लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथा भाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असं म्हणतात, हे पाहावं लागेल”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि खडसेंवर निशाणा साधला होता. तसेच, “एकट्या देवेंद्रजींना नाथाभाऊंनी टार्गेट करणं बरोबर नाही. भाजपचे निर्णय सामूहिक असतात”, असंही ते म्हणाले होते. (Eknath Khadse reaction on Chandrakant Patils statement)

संबंधित बातम्या:

स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील राजकारण कसं बदलणार?

BLOG – राष्ट्रवादीत खडसेंचाही ‘राणे’ तर होणार नाही ना?

एकनाथ खडसेंकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद?; मंत्रिमंडळात फेरबदल नाही; पवारांनी दिले संकेत

(Eknath Khadse reaction on Chandrakant Patils statement)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.