Eknath Khadse : भाजपमध्ये 40 वर्ष असताना चांगला, राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता, एकनाथ खडसेंचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एखदा भाजप (BJP) आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केलीय.

Eknath Khadse : भाजपमध्ये 40 वर्ष असताना चांगला, राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता, एकनाथ खडसेंचा सवाल
Eknath Khadse

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एखदा भाजप (BJP) आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केलीय. एका वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो की मागं ईडी लावता.मी चाळीस वर्ष तुमच्याबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की तुम्ही ईडी लावता आणि तुम्ही तारीख पे तारीख सुरु असल्याचं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपवर व देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता एकनाथ खडसे यांनी जहरी टीका केलीय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपाला जळगावातील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात भाषणात नाव न घेता टोले मारले

पाहा व्हिडीओ

भाजपमध्ये काम करत असताना पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर काम केलं, परिश्रम केलं, कष्ट केलं हे तुम्ही पाहिलं आहे. अनेक लोक घडवले, पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनं मोठे झाले. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. या ठिकाणी मेहनतीनं कष्टानं माणसं उभं केली आणि घडवली. 40 वर्ष रक्ताचं पाणी करत पक्षासाठी फिरत होते. 30 वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली.

काय गुन्हा केला मी?

अलीकडचे राजकारण कशाप्रकारे चालते हे तुम्ही पाहत आहे. कोणाच्या मागे कशा ईडीच्या चौकशा लावल्या जाता ते तुम्ही पाहताय. 40 वर्षांमध्ये मी तुमच्या सोबत चांगला होतो. एक वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की मागं ईडी लावता. तारीख पे तारीख सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले आणि आता त्याचा अपमान करता. त्याचे फळे तुम्हाला भोगावे लागतील जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहेय

अनेक लोकं उभी केली

एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक लोक उभी केल्याचं सांगितलं. अनेक लोक पक्षाच्या माध्यमातून मोठे केले मात्र जे मलाच झाले नाही तर तुम्हाला काय होतील, असा सवाल त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

इतर बातम्या :

मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे- खडसे

मला ठाण्याला दाखवायची गरज नाही पण महाजनांना बुधवार पेठेत दाखवा-एकनाथ खडसे

Eknath Khadse slam BJP and Devendra Fadnavis over action of ed against him

Published On - 9:31 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI