फडणवीस केंद्रीय मंत्री झाल्यास आनंद, महाराष्ट्राला चांगला उपयोग करुन घेता येईल : खडसे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात (Devendra Fadnavis may Modi Govt) स्थान मिळणार असेल, तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

फडणवीस केंद्रीय मंत्री झाल्यास आनंद, महाराष्ट्राला चांगला उपयोग करुन घेता येईल : खडसे

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात (Devendra Fadnavis may Modi Govt) स्थान मिळणार असेल, तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंनी (Devendra Fadnavis may Modi Govt) ही प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत येणार असतील तर स्वागत आहे. आपला एक सहकारी केंद्रात मंत्री होणार असेल तर याचा आनंदच होईल. दिल्लीनं एकदा सांगितल की केंद्रात येण्याचा मार्ग सुकर होतो, इथे पक्षाचा आदेश अंतिम असतो”

आपल्या बरोबर काम करणारा नेता जर केंद्रीय मंत्रिमंडळात असेल, तर महाराष्ट्राला त्याचा चांगला उपयोग करुन घेता येईल. त्याबाबत मला समाधानच वाटेल. वरिष्ठांना जर वाटलं, किंवा केंद्रीय नेतृत्त्वाने जर आदेश दिले तर ते केंद्रामध्ये जाऊ शकतील, असं खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात?

दरम्यान, सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने  देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकार पायउतार झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर यांसारख्या नेत्यांच्या निधनाने केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्यासारखा क्लीन चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांना पसंती आहे.

याशिवाय महाराष्ट्रात शिवसेनेसोबत फडणवीसांचे संबंध ताणल्यामुळे, त्यांना केंद्रात आणून राज्यातील भाजप-शिवसेना संबंध पुन्हा सुधारु शकतात अशी आशा भाजपला आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी केंद्रात संधी मिळू शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI