Devendra Fadnavis : ‘आपले सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदेच, चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले’ पाटलांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल?

आपले सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले. माध्यमांचं ते कामंच आहे, असं फडणवीस यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटलं.

Devendra Fadnavis : 'आपले सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदेच, चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले' पाटलांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 5:38 PM

नवी मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या वक्तव्याची दखल घेण्यात आली आणि पाटील यांचं भाषण सोशल मीडियावरुन काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) डॅमेज कंट्रोल करत असल्याचं पाहायला मिळालं. ‘आपल्यापैकीही अनेकांना माहिती नव्हतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. पण हे अचानक घडलं नव्हतं तर सगळंकाही ठरवून होतं’, असं फडणवीस यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपले सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले. माध्यमांचं ते कामंच आहे, असं फडणवीस यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या (BJP Working Committee) बैठकीत म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे. सामाजिक आर्थिक प्रगतीचं उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो. त्यामुळे हा गड जो आपण जिंकला आहे. पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या यात्रेत महाराष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करुन द्यायचं आहे. राज्यातील 12 कोटी जनतेची इच्छा होती की हे सरकार आलं पाहिजे. त्यांच्या मनातील संकल्पना आज आपण खऱ्या अर्थाने पूर्ण केलीय. गेली अडीच वर्षे आपली संघर्षात गेली. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासात एक असं सरकार ज्यांनी अडीच वर्षे फक्त सूड उगवण्याचं काम केलं. एक अघोषित आणीबाणी राज्यात होती. आमच्याविरोधात बोलतात तर 10 – 12 पोलीस ठाण्यात फिरवू, जेलमध्ये टाकू, असं सगळं सुरु होतं. अनाचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची परिसीमा गाठली होती. मात्र आज खुला श्वास घेऊन आपण ही बैठक घेत आहेत. फक्त आपणच नाही तर महाराष्ट्रातील जनतेनही मोकळा श्वास घेतलाय, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

‘पहिल्या दिवसापासून मनात गाठ मारली’

मी सांगायचो की सरकार चाललंय ते भगवान भरोसे चाललंय. त्यामुळे राज्याची विकासाची गती खुंटली होती. झालेलं परिवर्तन सत्तेसाठी नाही. तर महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी आहे. प्रगतीचं सगळी काम ठप्प होतं. विकासाची कामच आम्हाला करायची नाहीत. केंद्र सरकारने, मागील सरकारनं सुरु केलेली विकासाची कामं बंद करण्याचं काम त्या सरकारनं केलं. आपण पहिल्या दिवसापासून मनात गाठ मारली की, एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि विरोधात बोललं की मारहाण करायची तर एकही दिवस यांना झोपू द्यायचं नाही. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या. एका कार्यकर्त्यावर तर 30 केसेस टाकल्या होत्या, असंही फडणवीस म्हणाले.

‘सत्य परेशान हो सकता है, प्रलंबित भी हो सकता है, पर सत्य पराजित नही हो सकता’

सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित भी हो सकता है, पर सत्य पराजित नही हो सकता. गेल्या काही दिवसातला घटनाक्रम पाहिला तर महाराष्ट्रात चमत्कार घडलाय. सत्तेत एक वेगळी ताकद असते. प्रत्येकाची एक मनोकामना असते, कुणाची वैयक्तिक असते कुणाची जनतेसाठी असते. पहिल्यांदाच असं घडलंय की सत्तेत असलेली मंडळी विरोधकांकडे आली. त्यांना माहिती होतं की हे सरकार पाच वर्षे असंच चाललं तर पुढच्या निवडणुकीत आम्ही दिसणार नाही. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

‘एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला’

फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, मी मनापासून एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करेल. एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. एवढे सगळे लोक नसते आले तर त्यांचं सामाजिक, राजकीय जीवन, इतकी वर्षाची त्यांची पुण्याची संपवण्यात आली असती. पण त्यांनी ठरवलं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशीच फारकत घेतली गेली असेल. ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो, त्यांच्यासोबतच जावं लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जावं लागत असेल. इतकंच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात बोलणाऱ्यासोबत, दाऊदसोबत संबंध असलेल्यांसोबत जाणं बाळासाहेबांचा शिवसैनिक सहन करु शकत नव्हता.

‘मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे ठरवूनच’

ज्या दिवशी हे ठरलं त्यादिवशी काय होणार हे मलाही आणि त्यांनाही माहिती नव्हतं. अनेक कथा कहाण्या तयार झाल्या. आपल्यापैकीही अनेकांना माहिती नव्हतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. पण हे अचानक घडलं नव्हतं तर सगळंकाही ठरवून होतं. केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकारं पाडतो असं नाही. त्यावेळी शिवसेनेनं आमच्याशी बेईमानीच केली. खरी शिवसेना आपल्यासोबत आहे. ती शिवसेना म्हणजे आता जी अल्पमतात आहे. मी स्वत: त्यांच्यासोबत बसलो आणि खऱ्या अर्थानं काय बोलायचं हे ठरलं त्यानुसार मी बोललो. प्रत्येक सभेत मोदीजी सांगायचे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आपण लढतोय. अमितभाई सांगायचे, खुद्द उद्धव ठाकरेही सांगायचे. आमचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न झाले. आम्ही बंडखोर मागे घेतले होते. पण त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. ते फक्त नंबरगेमची वाट पाहत होते. ज्यावेळी तिघांचं मिळून सरकार येईल असं वाटलं तेव्हा त्यांनी आमचा फोनही घेतला नाही. काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत झाली. त्याचवेळी आजच्या परिस्थितीचं बिजारोपण झालं, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवलाय.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.