AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात आहे? आता खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितलं हात आहे की नाही!

आमच्या बंडाला भाजपची चिथावणी नाही. आम्हाला भाजपचा पाठिंबा नाही. हे आमचं शिवसेनेच्या आमदारांचं बंड आहे. याचा भाजपशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात आहे? आता खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितलं हात आहे की नाही!
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 24, 2022 | 9:32 AM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने अनेक तर्क वितर्कांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचं (BJP) पाठबळ आहे, अशी एक चर्चा आहे. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच त्यावर भाष्य केलंय. आम्हाला भाजपचा पाठिंबा नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या बंडाला भाजपची चिथावणी नाही. आम्हाला भाजपचा पाठिंबा नाही. हे आमचं शिवसेनेच्या आमदारांचं बंड आहे. याचा भाजपशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

भाजपचा पाठिंबा आहे का?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचं पाठबळ आहे, अशी एक चर्चा आहे. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच त्यावर भाष्य केलंय. आम्हाला भाजपचा पाठिंबा नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या बंडाला भाजपची चिथावणी नाही. आम्हाला भाजपचा पाठिंबा नाही. हे आमचं शिवसेनेच्या आमदारांचं बंड आहे. याचा भाजपशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

भाजपचा पाठिंबा नसल्याचा दावा जरी एकनाथ शिंदे करत असले तरी जे कॅमेऱ्यामध्ये कैद झालं ते वास्तव वेगळं आहे. सूरतच्या ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार थांबले आहेत, तिथे भाजपच्या काही नेत्यांचा वावर दिसून आला. मोहित कंभोज त्या हॉटेलमध्ये दिसले. एकनाथ शिंदेही मविआचा पाठिंबा काढून घ्या आणि भाजपला पाठिंबा द्या या भूमिकेवर ठाम आहेत. शिवाय भाजपमध्ये होणाऱ्या हालचाली पाहता भाजपचा शिंदेगटाला पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

कोकणातील आणखी आमदार भास्कर जाधव हे देखील त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, यावर एकनाथ शिंदे यांना टीव्ही 9चे प्रतिनिधी मयुरेश गणपत्ये यांनी विचारपूस केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. भास्कर जाधव तुमच्या संपर्कात आहेत, ते देखील तुमच्या गटात सामील होणार आहेत, असं सांगितलं जातंय, या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय, की भास्कर जाधव यांच्याशी माझं कोणतंही बोलणं झालेलं नाही. भास्कर जाधव यांचं मला काही माहीत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. टीव्ही 9च्या प्रतिनिधींना एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असता, त्यांनी ही माहिती दिली.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...