Eknath Shinde: बंडखोर आमदारांचा गुवाहाटीतला मुक्काम वाढला, हॉटेलचं बुकिंग दोन दिवसांनी वाढवलं, एका दिवसाचा खर्च 8 लाख

बंडखोर आमदार हे गेल्या चार दिवसांपासून आसाममधील गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये हे आमदार मुक्कामाला आहेत. हे आमदार आता आणखी दोन दिवस याच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत.

Eknath Shinde: बंडखोर आमदारांचा गुवाहाटीतला मुक्काम वाढला, हॉटेलचं बुकिंग दोन दिवसांनी वाढवलं, एका दिवसाचा खर्च 8 लाख
Image Credit source: TV9
दादासाहेब कारंडे

| Edited By: सागर जोशी

Jun 25, 2022 | 10:41 PM

गुवाहाटी : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाचा आज पाचवा दिवस आहे. तर बंडखोर आमदार हे गेल्या चार दिवसांपासून आसाममधील गुवाहाटीच्या (Guwahati) रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये हे आमदार मुक्कामाला आहेत. हे आमदार आता आणखी दोन दिवस याच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत. कारण आत्ताच दोन दिवासांनी हॉटेलचं बुकिंग हे वाढवल्याची माहिती समोर आली आहे. या हॉटेलमध्ये आमदारांचा एका दिवसाचा खर्च 8 लाख रुपये इतका आहे. तरीही 30 जूनपर्यंत आमदारांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असणार आहे. आधीचं बुकिंग हे 28 जुलैपर्यंत होतं. राज्यात शिवसेने (Shivsena) उगारलेल्या तीव्र आंदोलनाचाही हा परिणाम मानला जात आहे. कारण शिवसैनिकांनी आज दिवसभरात अनेक आमदारांची कार्यालयं शिवसेना स्टाईलनं फोडली आहे. एवढेच काय शांतता राखा म्हणूण सांगण्याऱ्या दीपक केसरकरांचं कार्यालयही यातून सुटलं नाही. तसेच सध्याचा राजकीय पेच जसाचा तसा असल्याने खबरदारी म्हणूनही ही बुकिंग वाढवण्यात आल्याचे कळतंय.

गेल्या अनेक दिवसांपासून आमदार हॉटेल मुक्कामीच

राज्यातले आमदार हे काय फक्त या बंडापुरतेच हॉटेलमध्ये राहिले नाहीत. तर त्याआधीही काही दिवस ते हॉटेलमध्येच होते. या बंडाच्या आधीच राज्यात लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यावेळी फोडाफोडी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले आमदार हे हॉटेलमध्येच ठेवले होते. तीही मुंबईतली चकाचक फाईव्ह स्टार हॉटेलं होती. त्यावेळी आमदारांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या निवडणुका संपल्यावर तर आमदार मतदार संघात परततील असं जनतेला वाटत होतं. मात्र या बंडाने शिवसेनेच्या आमदारांचा हॉटेलमधील मुक्काम आणखी वाढला. सुरूवातीची एक रात्र गुजरातमध्ये तर त्यानंतर गेले चार दिवस झाले गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये हे आमदार मुक्कामाला आहेत.

एका दिवसाचा खर्च किती?

शिंदे गटाच्या या आमदारांचा एका दिवसाचा खर्च हा तब्बल एका दिवसाचा खर्च 80 लाख रुपये आहे. त्यामुळे एवढा मोठा पैसा खर्च कोण करतंय? असेही सवाल आता या आमदारांना विचारले जात आहे. मात्र आमच्याकडे पैसा आहे. आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या खर्चावर याठिकाणी थांबलेलो नाही, अशी उत्तरं ही दीपक केसरकरांकडून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात येणे सुरक्षित वाटत नाही

तुम्ही महाराष्टात कधी परत येणार आहात. तुम्हाला शिवसेनेकडूनही चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं. असे प्रश्न केसरकरांना विचारले असता. आत्ता येणं सुरक्षित वाटत नाही, असे थेट उत्तर हे दीपक केसरकर यांनी दिलं आहे. त्याला कारण ठरलंय आक्रमक झालेले ठाकरे समर्थक शिवसैनिक, या शिवसैनिकांनी गेल्या दोन दिवसांपासून या बंडखोरांची कार्यलयं फोडायला सुरूवात केली आहे. तसेच कुणाच्या पोस्टरला काळं फास, कुणाच्या पोस्टरला चपला मार, असेही प्रकार शिवसैनिकांकडून केले जात आहे. त्यामुळे यांच्या उद्रेकाला सामोरे जावं लागू नये, यासाठी हे आमदार अजून काही दिवस गुवाहाटीतच राहणे पसंत करत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें