AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे गेले त्याची संपूर्ण कहाणी, महाराष्ट्रातील महाबंडाची गोष्ट…

महाराष्ट्रातील महाबंडाची गोष्ट...

'ते' 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे गेले त्याची संपूर्ण कहाणी, महाराष्ट्रातील महाबंडाची गोष्ट...
| Updated on: Dec 22, 2022 | 4:36 PM
Share

मुंबई : राजकारणात वेगाने होणाऱ्या बदलांचा दाखला द्यायचा असेल तर अनेकदा बिहारच्या राजकारणाचा दाखला दिला जातो. पण आता हे उदाहरण देताना महाराष्ट्र्चा दाखला (Mahatrashtra Politics) दिला जाऊ शकतो. राज्याच्या राजकारणात या वर्षी घडलेली एक घटना सर्वाधिक चर्चेत राहिली. ती घटना म्हणजे राज्यातील सत्तांतर! या घटनेने राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल (Eknath Shinde Rebellion) झाले. त्याचंच हे सविस्तर वृत्त…

तारीख होती 20 जून. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला होता. निवडणुकीत जिंकलेल्यांचा जल्लोष सुरू होता. त्यात नेते-कार्यकर्ते व्यस्त होते. अशातच शिवसेनेच्या गोटात मात्र वेगळाच गोष्टी घडत होत्या. शिवसेनेचे नेते मोठ्या बंडाच्या तयारीला लागले होते.

राज्याच्या राजकारणातील अभूतपूर्व बदलांसह 21 जूनचा दिवस उजाडला. आधी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या. एकनाथ शिंदेंशी संपर्क होत नाहीये त्यांनी बंड केलंय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. मग हळूहळू ही बातमी अधिक व्यापक होऊ लागली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य आमदारही होते.एव्हाना एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचं स्पष्ट झालं होतं.

एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतला गेले. तिथे हॉटेलमध्ये हे सगळे आमदार थांबले होते. उर्वरित आमदारांपैकी एक एक आमदार सूरतला जात या बंडात सामील होत होता.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारासह आपला मोर्चा गुहावाटीला हलवला. तिथेही आणखी काही आमदार या बंडात सामील झाले. पुढे हे आमदार गोवामार्गे मुंबईत आले. बहुमत सिद्ध केलं.

सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. पण सगळ्यांचा अंदाज चुकवत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. अन् सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अन् सगळ्याचा अंदाज चुकवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुपख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शरद पवार यांनी पुलोद सरकार सत्तेत आणलं त्यानंतर राज्यात झालेलं हे मोठं बंड होतं. या बंडाचा दाखला पुढचे अनेकवर्ष राज्यासह देशाच्या राजकारणात दिला जाणार आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.