AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याची कायदेशीर लढाई आता सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता ही कायदेशीर लढाई आगामी काळात आणखी जास्त तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस
Image Credit source: tv9
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 26, 2023 | 5:29 PM
Share

मुंबई | 26 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आधी महाविकास आघाडीमध्ये होते. ते महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना देखील राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पण वर्षभरापूर्वी सत्तापरिवर्तन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात सुरुवातीचं एक वर्ष अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले. पण गेल्या महिन्यात त्यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार घडामोडी घडल्या. त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2 जुलैला त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्व नेत्यांसाठी खातेवाटप देखील करण्यात आलंय. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. याच फुटीमध्ये जे दोन गट पडले आहेत त्यापैकी एका गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस का बजावली?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

अजित पवार यांनी 30 जूनला केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याकडे राहावं, अशी याचिका अजित पवार गटाने निवडणूक आयोगात दाखल केली आहे. अजित पवार यांच्या या याचिकेवर आता शरद पवार गटाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पक्ष नक्की कुणाचा याबाबत निवडणूक आयोगात याचिका सुरु होईल.

शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीची सुनावणी होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेना पक्षासारखीच फूट पडली आहे. शिवसेना पक्षात वर्षभरापूर्वी देखील अशीच फूट पडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगत हे प्रकरण गेलं होतं. आतादेखील तशाच घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आता निवडणूक आयोगात पोहोचला आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोग दोन्ही पक्षाची भूमिका ऐकून घेईल. त्यानंतर योग्य निर्णय देईल. या सुनावणीसाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....