कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक | महाविकास आघाडीचा दणदणीत विजय, भाजपला एकही जागा नाही

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे, तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक | महाविकास आघाडीचा दणदणीत विजय, भाजपला एकही जागा नाही

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे (APMC Election Result). दुसरीकडे भाजपला खातंही खोलता आलेलं नाही. 6 महसूल आणि 4 व्यापारी मतदारसंघात भाजपला एकही विजय न मिळाल्याने महाविकासआघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं आहे. राज्यातला महाविकासआघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्येही यशस्वी झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते.

LIVE Updates:

महसूल विभाग विजयी उमेदवार

अमरावती :

1.प्रवीण देशमुख ( महाविकास आघाडी) 2. माधवराव जाधव ( महाविकास आघाडी)

कोकण विभाग :

3. प्रभु पाटील (अपक्ष) 4. राजेंद्र पाटील (महाविकास आघाडी)

पुणे विभाग :

5. बाळासाहेब सोरस्कर ( महाविकास आघाडी) 6. धनंजय वाडकर ( महाविकास आघाडी)

नागपूर विभाग :

7.हुकूमचंद आमधरे (महाविकास आघाडी) 8.सुधीर कोठारी ( महाविकास आघाडी)

नाशिक विभाग :

9.जयदत्त होळकर ( महाविकास आघाडी ) 10.अद्वैत हिरे ( अपक्ष)

औरंगाबाद :

11. वैजनाथ शिंदे ( महाविकास आघाडी) 12. अशोक डक ( महाविकास आघाडी )

व्यापारी विभाग विजयी

  • कांदा बटाटा मार्केट : अशोक वाळुंज (महाविकास आघाडी)
  • भाजीपाला मार्केट : शंकर पिंगळे (अपक्ष )
  • दाणा मार्केट : निलेश विरा ( अपक्ष)
  • मसाला मार्केट : विजय भुता (अपक्ष )
  • माथाडी मतदार संघ : शशिकांत शिंदे ( महाविकास आघाडी)
  • फळ मार्केट : संजय पानसरे – बिनविरोध (महाविकास आघाडी )

[svt-event title=”एपीएमसी निवडणुकीत विजय उमेदवारांचं शशिकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन” date=”02/03/2020,2:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एपीएमसी निवडणुकीत प्रवीण देशमुख सर्वाधिक मतांनी विजयी” date=”02/03/2020,2:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी कांदा-बटाटा बाजाराच्या आवारातील लिलावगृहात झाले. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. 6 महसूल विभागांमध्ये एकूण 58 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 6 महसुल आणि 4 व्यापारी अशा एकूण 10 मतदारसंघाची निवडणूक शनिवारी (29 फेब्रुवारी) पार पडली. यात एकूण 93.72 टक्के मतदान झालं. या निवडणुकीमध्ये एकूण 58 उमेदवार रिंगणात होते. 6 महसूल विभागात एकूण 3928 मतदारांपैकी 3878 मतदारांनी मतदान केलं. या निवडणुकीत माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांच्यासह माजी संचालक शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, कीर्ती राणा यांची प्रतिष्ठा लागली होती.

शनिवारी (29 फेब्रुवारी) झालेल्या मतदानात 6 महसूल विभागात 98.72% तर वाशी मार्केटमध्ये 87.21% मतदान झालं. एकूण सरासरी 92.57% मतदान झालं होतं.

APMC Election Result

Published On - 2:00 pm, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI