Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच सर्वांना करुन दिली पत्नीची ओळख, कोण आहेत जान्हवी?
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरुन पत्नीची सर्वांना ओळख करुन दिली. प्रशांत किशोर यांची पत्नी कोण आहे? काय करतात त्या?. प्रशांत किशोर देशात निवडणूक रणनितीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची पत्नी बरोबर पहिली भेट कुठे झाली होती?

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर लवकरच राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. प्रशांत किशोर यांनी एक अभियान सुरु केलं होतं. 2 ऑक्टोबरला ते आपलं अभियान पक्षामध्ये बदलणार आहेत. प्रशांत किशोर यांनी पाटण्यामध्ये एका महिला सम्मेलनाला संबोधित केलं. या महिला सम्मेलनात पहिल्यांदा त्यांनी पत्नी जान्हवी दास यांची सर्वांशी सार्वजनिक ओळख करुन दिली. प्रशांत किशोर मागच्या दोन वर्षांपासून बिहारच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच महिला सम्मेलनात त्यांनी एक खुलासा केला. त्यांना कोणाच समर्थन आहे? त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे? ज्यामुळे राजकारणात ते पुढे जातायत.
प्रशांत किशोर यांनी पत्नीची ओळख करुन दिली. “संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी जान्हवीने उचलली आहे. तुला बिहारमध्ये जे करायच आहे, ते करं. घर-परिवाराची जबाबदारी मी सांभाळीन” असं जान्हवीने मला सांगितल्याच प्रशांत किशोर म्हणाले. “पहिल्यांदा तुमच्या सर्वांशी ओळख करुन देण्यासाठी मी माझ्या पत्नीला बोलावल आहे. माझ्या पत्नीच नाव डॉक्टर जान्हवी आहे. माझी पत्नी आहे, म्हणून मी तुमच्याशी ओळख करुन देत नाहीय, तर तुमचा भाऊ काम करु शकतोय, कारण घर-कुटुंबाची जबाबदारी जान्हवीने उचलली आहे.
प्रशांत किशोर काय म्हणाले?
“जितकेही पुरुष आज जन सुराजमध्ये येऊन काम करतायत त्यामागे कारण आहे, तुमच्यासारखीच कुठली तरी महिला त्यांच्यामागे उभी आहे. त्याच सांगतायत राजकारणात जा, मुलांची चिंता करु नका. जर, तुम्ही आमचा भार उचलताय, तर आमचही तुमच्याप्रती कर्तव्य आहे” असं प्रशांत किशोर म्हणाले.
जान्हवी दास काय बोलल्या?
एकाबाजूला प्रशांत किशोर यांनी पत्नीची ओळख करुन दिली. त्याचवेळी पत्नी सुद्धा प्रशांत किशोर यांचं समर्थन करताना दिसली. प्रशांत किशोर यांनी नवीन चळवळ सुरु केलीय. तुम्ही यावर काय बोलाल. त्यावर जान्हवी दास एवढच बोलल्या, ‘माझं त्यांना पूर्ण समर्थन आहे’
जान्हवी दास कोण आहेत?
प्रशांत किशोर यांची पत्नी जान्हवी दास आसाम गुवाहटीच्या राहणाऱ्या आहेत. पेशाने त्या डॉक्टर आहेत. राजकीय रणनितीकार बनण्याआधी पीके यांनी यूएन हेल्थ प्रोग्राममध्ये काम केलं, ही तीच वेळ होती, जेव्हा पीके आणि जान्हवीची भेट झाली. यूएनच्या हेल्थ प्रोग्राममध्ये भेट झाल्यानंतर दोघांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी लग्न केलं. पीके आणि जान्हवी यांना एक मुलगा सुद्धा आहे.
प्रशांत किशोर किती जागांवर निवडणूक लढवणार?
प्रशांत किशोर यांनी वर्ष 2022 मध्ये 2 ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये एक जन अभियान सुरु केलं होतं. त्या अंतर्गत त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला. आता बिहार विधानसभेच्या निवडणुका हळू-हळू जवळ येत आहेत, त्यावेळी प्रशांत किशोर यांनी या अभियानाला राजकीय पक्षात बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशात किशोर येत्या 2 ऑक्टोबरला जन सुराज पार्टी लॉन्च करणार आहेत. या सम्मेलनानंतर मीडियाशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, “2025 मध्ये जनसुराज पार्टी 243 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यावेळी जन सुराजकडून कमीत कमी 40 महिलांना उमेदवारी दिली जाईल”
