Nilesh Rane Corona | माजी खासदार निलेश राणेंना कोरोना, मुंबईत सेल्फ क्वारंटाईन

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे

Nilesh Rane Corona | माजी खासदार निलेश राणेंना कोरोना, मुंबईत सेल्फ क्वारंटाईन

मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे (Nilesh Rane Tested Corona Positive). त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्याने कोव्हिड-19 चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असं ट्विट निलेश राणेंनी केलं. तसेच, गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनीही त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे (Nilesh Rane Tested Corona Positive).

“कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असं ट्विट त्यांनी केलं.

निलेश राणे मुंबईमध्ये सेल्फ क्वारंटाईन

निलेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये कोरोना चाचणी केली होती. मात्र, तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. काल रात्री त्यांनी पुन्हा मुंबईमध्ये चाचणी केली. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. मात्र, आपली प्रकृती ऊत्तम असल्याचे त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले. सध्या ते मुंबईमध्ये सेल्फ क्वारंटाईन आहेत.

कोण आहेत निलेश राणे?

निलेश राणे हे भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र. 2009 मध्ये ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदारपदी निवडून आले होते. वयाच्या 28 व्या वर्षी ते संसदेत पोहोचले. मात्र 2014 मध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडून ते पराभूत झाले. राणे कुटुंबाने 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

निलेश राणे हे सोशल मीडियावरील आक्रमक पवित्र्यासाठी ओळखले जातात. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनेक वेळा त्यांची ट्विटरवर जुगलबंदी रंगली आहे.

Nilesh Rane Tested Corona Positive

संबंधित बातम्या :

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर, ठाकरे पितापुत्राने राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *