मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात, त्यांना निर्णय घेता येत नाहीत : विखे पाटील

आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. (Radhakrishna Vikhe Patil attack Maha govt)

मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात, त्यांना निर्णय घेता येत नाहीत : विखे पाटील

अहमदनगर : “आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे. त्यांना  स्वतः काही निर्णय घेता येत नाहीत”, अशी टीका  भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विखे पाटलांनी आज इंदोरीकर महाराजांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं . (Radhakrishna Vikhe Patil attack Maha govt)

दूधाचे दर वाढू नये ही मंत्र्यांचीच भूमिका असून दूध संघातून मिळणारा मलिदा खाणारे मंत्री आहेत”, असा घणाघाती आरोप भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

“दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका आहे. आपल्या दुधसंघातून मलिदा खाण्याचं काम सरकारमधील मंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे. मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत. त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाहीत”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेची सरकारने फसवणूक केली आहे. हे फेकू सरकार आहे, असा आरोप विखे पाटलांनी केला. तर राज्यातील कोरोनाची परीस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असून, आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत असल्याचं विखे पाटील म्हणाले.

कोव्हिडच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र एक नंबरला आहे ही दुर्दैवी बाब आहे. कोव्हिड संदर्भात परिस्थिती हाताळण्यात सरकारला आलेल हे अपयशच आहे. अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन उठवण्याचे भाष्य करत आहे. त्याचे परिणाम जनता भोगत आहे. केंद्रावर टीका करुन जनतेची दिशाभूल करु नका असंही विखे पाटील म्हणाले.

संजय राऊत यांचा मुलाखती घेण्याचा सिलसिला सुरु आहे. सर्व मुलाखती झाल्या की भाष्य करु, असं म्हणत विखे पाटलांनी संजय राऊत यांच्यावर बोलण्याचं टाळलं.

(Radhakrishna Vikhe Patil attack Maha govt)

संबंधित बातम्या 

सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं  

विखेंनी वापरलेला ‘लाचार’ शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य, विखेंच्या टीकेला थोरांतांचं प्रत्युत्तर   

लाचार काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI