धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, निवडणूक आयोगाचे पोलिसांना आदेश

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहिरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. तपासात तसं सिद्ध झालं आहे. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती मुंबई शहराचे […]

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, निवडणूक आयोगाचे पोलिसांना आदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहिरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. तपासात तसं सिद्ध झालं आहे. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याचीही तोंडी तक्रार आली होती. पण तपासाअंती त्यात तथ्य आढळलं नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाबाबत माहिती दिली. या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरमाना प्रसिद्ध करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या बी 4 या सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आचारसंहिता लागू असताना सरकारी मालमत्तेचा वापर करता येत नाही. त्यामुळेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीविरोधात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले होते. तपासाअंती सरकारी बंगल्याचा गैरवापर केल्याचं निष्पन्न झालं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.