AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडीवर कमळाचे चित्र, सांगलीच्या महापौर अडचणीत!

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीचं मतदान काल (23 एप्रिल) पार पडलं. यावेळी मतदान करण्यासाठी गेलेल्या सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण महापौर संगीता खोत यांनी मतदाना करण्यासाठी कमळाचे चित्र असलेली साडी नेसली होती. या प्रकारामुळे संगीता खोत यांच्याविरोधात महात्मा गांधी पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर संगीता […]

साडीवर कमळाचे चित्र, सांगलीच्या महापौर अडचणीत!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीचं मतदान काल (23 एप्रिल) पार पडलं. यावेळी मतदान करण्यासाठी गेलेल्या सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण महापौर संगीता खोत यांनी मतदाना करण्यासाठी कमळाचे चित्र असलेली साडी नेसली होती. या प्रकारामुळे संगीता खोत यांच्याविरोधात महात्मा गांधी पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापौर संगीता खोत या काल दुपारी माणिकनगर येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी संगीता खोत यांनी कमाळाचे चित्र असलेली साडी नेसली होती. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाचा त्यांनी प्रचार केला, अशी तक्रार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रशासनाकडे केली. त्यानंतर निवडणूक विभागाने या तक्रारीची दखल घेत गांधीनगर पोलीस ठाण्यात महापौर संगीता खोत यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा रात्री दाखल केला.

सांगीता खोत या भाजपच्या सांगलीतील नेत्या असून, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आहेत.

सांगलीत तिरंगी लढत

सांगलीत यंदा लोकसभेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळते आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, आघाडीकडून स्वाभिमानीच्या तिकिटावर विशाल पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर रिंगणात आहेत. तिघेही तोडीस तोड उमेदवार असल्याने सांगलीत कोण बाजी मारणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!