वंचित बहुजन आघाडीकडून वर्ध्यात माजी एसीपी मैदानात

वर्धा : लोकसभा निवणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वर्तुळात कमालीची हालचाल बघायला मिळते आहे. आता काहीच दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. मात्र, वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप तसेच बसपामधील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये. तर वंचित बहुजन आघाडीने मात्र आज माजी सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे स्वाभिमानी …

वंचित बहुजन आघाडीकडून वर्ध्यात माजी एसीपी मैदानात

वर्धा : लोकसभा निवणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वर्तुळात कमालीची हालचाल बघायला मिळते आहे. आता काहीच दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. मात्र, वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप तसेच बसपामधील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये. तर वंचित बहुजन आघाडीने मात्र आज माजी सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आघाडीसाठी काँग्रेसला अल्टीमेटम दिलं आहे. तर दुसरीकडे भाजपात रामदास तडस की, सागर मेघे असा अंतर्गत वाद सुरु झाला आहे.

दत्ता मेघे विरुद्ध रामदास तडस

प्रमुख राजकीय पक्षाचे भावी उमेदवार कोण होणार? याकडे सध्या मतदारांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच भाजपकडून उमेदवारीसाठी सागर मेघे समर्थक आणि रामदास तडस समर्थक अशी गटबाजी वाढलेली दिसत आहे. खासदार रामदास तडस यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. तर मेघे समर्थकही सागर मेघेंची उमेदवारी निश्चित असल्याचं सांगत आहेत. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, वर्धा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा रामदास तडस यांना भाजपकडून संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर सागर मेघे यांचं नाव मागे पडल्याची माहिती आहे. रामदास तडस आणि दत्ता मेघे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे.

काँग्रेसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्या दोन जागांच्या मागणीमुळे प्रचार हालचाली  थंडावल्या आहेत. त्यामुळे नेमकी जागा कुणाला सुटते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच चारुलता टोकस आणि स्वाभिमानीचे सुबोध मोहिते यांची धडपड आता धडकीत बदलली आहे. तर दुसरीकडे बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी लवकरच सशक्त उमेदवार देणार असल्याचं सांगितलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *