शहीद करकरेंचा महाराष्ट्रातील सहकारी साध्वी प्रज्ञाविरोधात निवडणूक लढवणार

भोपाळ : भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्द्ल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचे पडसाद थांबताना दिसत नाही. शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) रियाज देशमुख यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख भोपाळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल करत आहेत. प्रज्ञा ठाकूरही भाजपकडून भोपाळच्या निवडणूक मैदानात आहेत. […]

शहीद करकरेंचा महाराष्ट्रातील सहकारी साध्वी प्रज्ञाविरोधात निवडणूक लढवणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

भोपाळ : भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्द्ल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचे पडसाद थांबताना दिसत नाही. शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) रियाज देशमुख यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख भोपाळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल करत आहेत. प्रज्ञा ठाकूरही भाजपकडून भोपाळच्या निवडणूक मैदानात आहेत.

प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्द्ल वादग्रस्त वक्तव्य केल्याने रियाज देशमुख यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. देशमुख म्हणाले, “भोपाळमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत आहे. कोणीही शहीद हेमंत करकरेंची बदनामी करु नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच मी प्रज्ञा ठाकूरविरोधात निवडणूक लढवण्याचे ठरवले.”

‘हेमंत करकरे महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांपैकी एक’

हेमंत करकरे महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी मला अनेक प्रकरणांचा तपास करताना मार्गदर्शन केले आणि माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे शहीद हेमंत करकरेंबाबत अपमानास्पद वक्तव्य मी कधीही सहन करु शकत नाही, असे मत रियाज देशमुख यांनी व्यक्त केले.

कोण आहेत रियाज देशमुख?

माजी ACP राहिलेल्या रियाज देशमुख यांनी हेमंत करकरेंसोबत काम केले आहे. ते करकरे यांच्यासोबत पोलीस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत होते. देशमुख ATS प्रमुख हेमंत करकरे यांना आपला आदर्श मानतात. देशमुख यांनी अमरावतीच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त (ACP) म्हणूनही काम केले. त्यानंतर ते निवृत्त झाले. त्यांनी जवळजवळ 30 वर्षे पोलीस दलात काम केले. ते सध्या औरंगाबाद येथे राहतात.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.