AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिदंबरम 43 दिवसांपासून तुरुंगात, वजन तब्बल पाच किलोने घटलं

आयएनएक्स मीडिया प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचं गेल्या 43 दिवसांमध्ये तब्बल पाच किलो वजन कमी झालं आहे.

चिदंबरम 43 दिवसांपासून तुरुंगात, वजन तब्बल पाच किलोने घटलं
| Updated on: Oct 19, 2019 | 12:11 PM
Share

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचं गेल्या 43 दिवसांमध्ये तब्बल पाच किलो वजन कमी झालं आहे (P. Chidambaram lost 5 kg). शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात पी. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या जामीनासाठी याचिका दाखल केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली (P. Chidambaram lost 5 kg).

43 दिवसांच्या तुरुंगवासात चिदंबरम हे दोनवेळा आजारी पडले, असं वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं. ‘त्यांच्या 43 दिवसांच्या तुरुंगवासादरम्यात चिदंबरम हे सलग दोनवेळा आजारी पडले, त्यांचं वजन 73.5 किलोवरुन 68.5 किलो झालं आहे’, असं सिब्बल यांनी सांगितलं.

न्यायमूर्ती आर. भानुमती, एएस बोपन्ना आणि ऋषिकेश रॉय यांचं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे.

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार (INX Media Scam) प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या चिदंबरम यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. त्याविरोधात काँग्रेस नेत्याच्या याचिकेवर ही सुनावणी झाली. दरम्यान खंडपीठाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकला आणि यावर काही दिवसांमध्ये निर्णय देण्यात येईल, असं सांगितलं.

तर, सीबीआयने या प्रकरणी पी चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती आणि इतर काही कंपन्यांसह 15 आरोपींविरोधात न्यायालयात आरोप पत्र दाखल केल्याची माहिती खंडपीठाला दिली.

सीबीआयचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांच्या जामीन याचिकेचा विरोध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन न करण्याचं धोरण आत्मसात करण्याची देशाला नितांत आवश्यकता आहे, असं तुषार मेहता यांनी सांगितलं. तसेच, चिदंबरम यांच्याविरोधात फसवणुकीचाही आरोप आहे. सध्या त्याबाबत तपास सुरु आहे. या प्रकरणी सिंगापूर आणि मॉरिशिअसला पाठवण्यात आलेल्या विनंती पत्राच्या उत्तराची आम्हाला प्रतिक्षा आहे, असंही त्यांनी न्यायालयात सांगितलं. साक्षीदारांना घाबरवण्यासाठी चिदंबरम यांची उपस्थिती पुरेशी आहे, त्यामुळे साक्षीदारांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना जामीन दिला जाऊ नये, अशी मागणी तुषार मेहता यांनी केली.

सीबीआयने पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्टला अटक केली होती. सध्या ते भ्रष्टाचार प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. अर्थ मंत्री असताना पी. चिदंबरम यांनी त्यांच्या कार्यकाळात 2007 मध्ये विदेशी गुंतवणूक मंडळ (Foreign Investment Promotion Board)अंतर्गत आयएनएक्स मीडियाला 305 कोटी रुपयाच्या विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देताना झालेल्या अनियमितेबाबत सीबीआयने 15 मे, 2017 मध्ये प्रकरण दाखल केलं होतं. त्यानंतर प्रवर्तन निदेशालयानेही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल केला.

चिदंबरम यांना दिल्ली उच्च नायालयाने 30 सप्टेंबरला जामीन फेटाळला. या निर्णयाला चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.