AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Congress: गोवा काँग्रेस मुक्त होणार?, दिगंबर कामतांसह आठ आमदारांचा आज भाजप प्रवेश?; गडकरी गोव्यात दाखल होणार

Goa Congress: यापूर्वीही काँग्रेसच्या गोव्यातील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. जुलै 2019मध्ये विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत बाबू कावलेकर यांनी काँग्रेसच्या नऊ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Goa Congress:  गोवा काँग्रेस मुक्त होणार?, दिगंबर कामतांसह आठ आमदारांचा आज भाजप प्रवेश?; गडकरी गोव्यात दाखल होणार
गोवा काँग्रेस मुक्त होणार?, दिगंबर कामतांसह आठ आमदारांचा आज भाजप प्रवेशImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 10, 2022 | 12:53 PM
Share

पणजी: गोव्यात काँग्रेसला मोठा जबरदस्त धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे बडे नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यासह आठ आमदार आज भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. गोव्यात काँग्रेसकडे 11 आमदार आहेत. त्यापैकी आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने गोवा काँग्रेस (congress) मुक्त होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याने काँग्रेसचं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आलं आहे. भाजपने या आमदारांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळेच या आमदारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या एका आमदारांने याबाबतची माहिती दिली आहे. तर कोलकाता येथेही काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे तीन विद्यमान आणि तीन माजी खासदार टीएमसीच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा आठवडा धक्क्याचा असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायरल लोबो यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपच्या हायकमांडनेही या आमदारांना पक्षात घेण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी हे आठही आमदार एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोवा विधानसभेची सदस्यसंख्या 40 आहे. काँग्रेसकडे 11, भाजपकडे 20, एमजीपीकडे दोन आणि तीन अपक्ष आमदार आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज संध्याकाळी तातडीने गोव्याला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

2024ची तयारी

दरम्यान, राज्यातील काँग्रेस आमदारांना पक्षात घेण्यास भाजपचा एक गट इच्छुक नसल्याचंही सांगितलं जातं. मात्र, 2024च्या लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेता जात आहे. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यातून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यावेळी त्याचं उट्टं काढण्यासाठी या आमदारांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, मला या प्रवेशाबाबतची काहीच माहिती नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंत तनावडे यांनी सांगितलं.

प्रवेश करणारे संभाव्य आमदार

मायकल लोबो राजेश फळदेसाई दिलायला लोबो केदार नाईक दिगंबर कामत एलेक्स सिक्वेरा संकल्प आमोणकर

तळ्यातमळ्यात

एल्टन डिकोस्टा रुडाल्फ फर्नांडिस

आधीही झटका, नंतर आणाभाका

यापूर्वीही काँग्रेसच्या गोव्यातील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. जुलै 2019मध्ये विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत बाबू कावलेकर यांनी काँग्रेसच्या नऊ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2022च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या आमदारांना चर्च आणि मंदिरात शपथ दिली होती. पक्ष सोडणार नाही आणि भाजपमध्ये जाणार नसल्याची ही शपथ देण्यात आली होती.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.