AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चार मंत्री घरी जाणार? महाराष्ट्रात वेगवान घडामोडी… , राऊतांच्या ट्विटने खळबळ

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

मोठी बातमी! चार मंत्री घरी जाणार? महाराष्ट्रात वेगवान घडामोडी... , राऊतांच्या ट्विटने खळबळ
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 20, 2025 | 7:56 PM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. चार मंत्री नक्की घरी जाणार, महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील! असा दावा राऊत यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत? 

‘फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे; चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील!’ असं ट्विट राऊत यांनी केलं आहे, त्यांनी यासोबतच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तो व्हिडीओ देखील शेअर केला आहे. राऊत यांच्या या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे कायमच चर्चेत असतात आता ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत, त्यांचा विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा  एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

सोबतच यावरून त्यांनी सरकार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील डिवचलं आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही,  भाजप निर्णय घेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काही काम शिल्लक राहिलेलं नाही आणि त्यामुळेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सभागृहात बसून रम्मी खेळण्याची वेळ आली असावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील एक ट्विट केलं आहे, त्या ट्विटमध्ये त्यांनी मोठा दावा केला आहे.  चार मंत्री नक्की घरी जाणार, महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील! असा दावा राऊत यांनी केला आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?