गजानन काळे प्रकरणावर पहिल्यांदाच ‘ठाकरें’ची प्रतिक्रिया, वाचा शर्मिला ठाकरे नेमक्या काय म्हणाल्या?

गजानन काळे यांच्यावरील आरोपांबाबत राज ठाकरे याच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणावर टिप्पणी करायची नाही असं म्हटलंय. आपल्याला माहिती नाही त्यावर बोलण्यात अर्थ नाही, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

गजानन काळे प्रकरणावर पहिल्यांदाच 'ठाकरें'ची प्रतिक्रिया, वाचा शर्मिला ठाकरे नेमक्या काय म्हणाल्या?
शर्मिला ठाकरे, मनसे नेत्या

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहे. दरम्यान, गजानन काळे यांच्यावरील आरोपांबाबत राज ठाकरे याच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणावर टिप्पणी करायची नाही असं म्हटलंय. आपल्याला माहिती नाही त्यावर बोलण्यात अर्थ नाही, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या. (Sharmila Thackeray’s reaction in Gajanan Kale and Sanjeevani Kale case)

गजानन काळे प्रकरणात प्रश्न विचारला असता मला यावर टिप्पणी करायची नाही. आपल्याला माहिती नाही त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. गजानन काळे यांच्या आईचं निधन झालं त्यावेळी सांत्वनासाछी आम्ही गेलो होतो. तेव्हा कुटुंबात असा कुठलाही वाद दिसला नाही. प्रसारमाध्यमांनी टीव्हीवर बातमी दाखवल्यानंतर आश्चर्य वाटलं. याबाबत पोलीस आपली कारवाई करतील, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. दादरमध्ये केतकर बंधुंनी चालू केलेल्या पुण्यातील शौकीन पाट शॉपचं उद्घाटन शर्मिला ठाकरे यांनी केलं. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

महाविकास आघाडीकडून काळेंच्या अटकेची मागणी

गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच पोलीस सेटलमेंटसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यानंतर आता गजानन काळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी या महिलांशी चर्चा केली.

महाविकास आघाडीतील महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता गजानन काळे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तशी माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी गजानन काळे यांच्या अटकेसाठी आक्रमक झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या 10 ते 15 महिलांनी आज गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, मोजक्या महिलांनाच यावेळी गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी परवानगी देण्यात आली.

घरगुती वाद आणि मारहाणीचा आरोप

“तो मला कायम बोलायचा की, तू सावळी आहेस… तुझी जात वेगळी आहे… तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केले, परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही, असं तो वारंवार बोलायला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये या कारणांवरुन बऱ्याच वेळा भांडण झालं… जेव्हा जेव्हा भांडण होई त्यावेळी गजानन मला मारहाण करत असे. मग मी माहेरी जायचे. पुन्हा काही दिवस उटल्यानंतर गजानन मला फोन करुन माझी माफी मागायचा. पुन्हा असं होणार नाही, असं सांगून मला घरी आणायचा. पण काही दिवस सरले की त्याचं नाटक पुन्हा सुरु व्हायचं”, असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सेटलमेंटसाठी दबाव टाकल्याचा आरोप

संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे. “नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी 11 तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं संजीवनी काळे व्हिडीओमध्ये म्हणतात.

संबंधित बातम्या :

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

मनसे नेते गजानन काळे यांच्या अटकेची शक्यता, महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गृहमंत्र्यांची भेट

Sharmila Thackeray’s reaction in Gajanan Kale and Sanjeevani Kale case

Published On - 7:23 pm, Mon, 16 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI