गौतम गंभीर निवडणुकीच्या रिंगणात, दिल्लीतून लढणार निवडणूक

गौतम गंभीर निवडणुकीच्या रिंगणात, दिल्लीतून लढणार निवडणूक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले आहे. त्यात नुकतंच भाजपने दिल्ली लोकसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात भारताच्या माजी सलामीवीर गौतम गंभीर यांना पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर 22 मार्च रोजी गौतम गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर अनेकांनी ते दिल्लीतून निवडणूक लढतील असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यात पूर्व दिल्लीतून गौतम गंभीरला तर मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान पूर्व दिल्लीतून भाजपचे विद्यमान खासदार महेश गिरी यांचे तिकीट मात्र कापण्यात आले आहे.

क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकार मारणारा गौतम गंभीर आता लवकरच राजकीय मैदानात फलदांजी करण्यास उतरणार आहे. त्यांचा सामना काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली आणि आम आदमी पार्टीचे नेते आतिशी मार्लेन यांच्यासोबत होणार आहे. येत्या 12 मे रोजी दिल्लीतील 7 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI