
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढतींकडे सगळ्या राज्याच लक्ष लागलं आहे. उदहारणार्थ माहीम, वरळी, बारामती. कारण, या मतदारसंघांमध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या तीन विधानसभा मतदारसंघाव्यतिरिक्त घनसावंगी विधानसभा मतदारसंघही चर्चेत आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात घनसावंगी विधानसभा मतदारसंघ येतो. घनसावंगी चर्चेत येण्यामागचं कारण आहे, अंतरवाली-सराटी गाव. मागच्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी गाव मराठा आरक्षण आंदोलनाच केंद्र राहिलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच अंतरवाली-सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्यासह समर्थकांवर पोलिसांचा लाठीमार झाला आणि अंतरावली-सराटी रातोरात चर्चेत आलं. या अंतरावाली-सराटीमध्ये आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांचे मोठे नेते भेट देऊन गेले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात महत्त्वाच्या बैठका आणि महत्त्वाचे निर्णय याच अंतरवाली-सराटीमधून घेतले जातात. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात ज्या अंतरावाली-सराटीमधून झाली, ते घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येतं. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. मतदारसंघ फेररचनेआधी हा भाग...