AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिटिंग करू नका… शिंदेसेनेने भाजपला सुनावले, रवींद्र धंगेकर यांची थेट प्रतिक्रिया; गोकुळचं राजकारण तापलं

गोकुळ दूध संघात सरकारी संचालक नियुक्तीवरून राजकारण तापले आहे. शिंदेसेनेने भाजपवर 'चिटिंग करू नका' म्हणत लोकशाही आणि सहकार मूल्यांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. रवींद्र धंगेकरांनी शेतकऱ्यांनी वाढवलेल्या संस्थांमध्ये अनावश्यक सरकारी हस्तक्षेप टाळण्याचे आवाहन केले, ज्यामुळे युतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

चिटिंग करू नका... शिंदेसेनेने भाजपला सुनावले, रवींद्र धंगेकर यांची थेट प्रतिक्रिया; गोकुळचं राजकारण तापलं
ravindra dhangekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 2:35 PM
Share

गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. कालपर्यंत काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेकडून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता शिंदेसेनेनेही राज्य सरकारला सुनावलं आहे. गोकुळ दूध संघाला शेतकऱ्यांनी लहान मुलासारखं वाढवलं आहे. या संघाचा आदर करा. लोकशाहीचा आदर करा. चिटिंग करू नका, अशा शब्दात शिंदेसेनेने भाजपला सुनावलं आहे. त्यामुळे गोकुळच्या मुद्द्यावर आता युतीतच जुंपल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

गोकुळमध्ये चार संचालक नेमण्यात आल्याने शिंदेसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. लोकशाहीत जनतेचा कौल घेतला जातो. जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवून कामकाज करावं लागतं. पण काही तरी त्रुटी ठेवायचा प्रयत्न करून अशा निवडणुकीला विलंब लावला जात आहे. उपाशी तापाशी राहून या संस्था वाढवलेल्या असतात. या संस्थांना शेतकऱ्यांनी मुलांसारखं वाढवलेलं असतं. त्यामुळे गोकुळमध्ये राजकारण न करता निकालाचा आदर राखला पाहिजे. सरकारने कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे. संस्था टिकवली पाहिजे. ओठावर एक आणि पोटावर एक असं नको. जे पोटात आहे तेच ओठावर असलं पाहिजे. उलट्या हाताने खाण्यापेक्षा सरळ हाताने खाल्लेलं कधीही चांगलं, अशा शब्दात रवींद्र धंगेकर यांनी भाजपला सुनावलं आहे.

लोकशाही आहे की नाही?

1950 रोजी विठ्ठलराव विखे पाटलांनी महाराष्ट्रात सहकार रुजवले. त्याला 70-80 वर्ष झाली आहेत. महाराष्ट्राने सहकारात मोठं योगदान दिलं आहे. अनेक सहकाराशी जनतेची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आताच्या काळात या संस्थेमध्ये इतका हस्तक्षेप करणं योग्य नाही. आम्ही सत्तेत असलो तरी आम्हाला लपून छपून बोलणं योग्य वाटत नाही. सहकाराला मोकळीक दिली पाहिजे. राज्यात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी या संस्थाना ताकद दिली. वेळ पडली तर आर्थिक ताकद दिली. पण गोकुळ पाहिल्यावर मनाला वाईट वाटतं. लोकशाही आहे की नाही असं वाटतं, असा उद्वेगही धंगेकर यांनी व्यक्त केला.

यात असं काय आहे?

अशा निवडणुका निरपेक्ष झाल्या पाहिजे. तो लोकशाहीचा विजय असतो. लोकशाहीचा आदर ठेवून चिटिंग करू नये. पूर्वी सहकारात सरकारचा हस्तक्षेप नव्हता. आता हस्तक्षेप दिसत आहे. खरं तर सहकारात पक्षीय राजकारण करू नये. शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्या हातात राहिली पाहिजे. राजकारण करून हस्तक्षेप करून संस्थेला वेठीस धरू नये. या संस्था महाराष्ट्राच्या वाहिन्या आहेत. त्याला सरकारने ताकद दिलं पाहिजे. त्याकडे राजकीय दृष्टीने पाहू नये. देशाच्या निवडणुकीपेक्षा गोकुळची निवडणूक मोठी झाली आहे. यात असं काय आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी