‘जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?’, गोपीचंद पडळकरांचा तिखट सवाल

भाजपचे विधानपरिषदेचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar), विशेषत: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्ला चढवला आहे.

‘जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?’, गोपीचंद पडळकरांचा तिखट सवाल
Sanjay Raut_Asaduddin Owaisi_Gopichand Padalkar

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar), विशेषत: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्ला चढवला आहे. उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.

मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्यावरुन पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. एवढंच नाहीतर अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही.

योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील. ते सक्षम आहेत. पण महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही.

महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट्या उड्या मारता हे रोजचं मनोरंजन बंद करा . आता महाराष्ट्रातील जनतेला या खेळाची किळस आलीये. जय हिन्द ! जय मल्हार !

‘सामना’मध्ये नेमकं काय म्हटलंय?

भाजपच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, घडवले जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते. दोन दिवसांपूर्वी ओवेसी हे प्रयागराजवरून लखनौला जात असताना वाटेत त्यांचे समर्थक जमले व त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावले.

इतके दिवस उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे नारे लागल्याची नोंद नाही, पण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ओवेसी येतात काय, ठिकठिकाणी भडकावू भाषणे करतात काय, त्यांच्या बेबंद समर्थकांची डोकी भडकवतात काय आणि मग ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची नारेबाजी सुरू होते काय, हा सर्व प्रकार पटकथालेखन ठरवल्याप्रमाणे सुरू असल्याच्या संशयास बळकटी येत आहे.

संबंधित बातम्या  

नाहीतर ओवेसींना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच पाहिलं जाईल, सामनातून कडाडून टीका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI