भाजपच्या तिसऱ्या यादीत मुंडे गटातील खासदाराला डच्चू

भाजपच्या तिसऱ्या यादीत मुंडे गटातील खासदाराला डच्चू

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने पहिली, दुसरी आणि आता तिसरी यादीही जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भापजने दोन विद्यमान खासदारांना डच्चू दिला. तिसऱ्या यादीतही भाजपने पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू दिला आहे. शिरोळेंच्या जागी सध्याचे राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. शिरोळेंचा पत्ता कट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचेही दिसत आहे.

पहिल्या यादीत भाजपने लातुरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड आणि अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी या दोघांना डच्चू दिला.  त्यांच्या जागीर लातूरमध्ये सुधाकरराव श्रृंगारे आणि नगरमध्ये सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यातच आता तिसऱ्या यादीतही भाजपने पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू दिला आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्यामागे कार्यकर्त्यांचं पाठबळ नसल्यामुळे त्यांना डच्चू देण्यात आल्याचं म्हटंल जात आहे.

लोकांचीही नाराजी

अनिल शिरोळे यांचा जनसंपर्कही म्हणावा तसा राहिला नाही. लोकांमध्ये न मिसळल्याने लोकांचीही त्यांच्यावर नाराजी दिसून येते. लोकांची कामं न झाल्यामुळे मतदारसंघातील जनताच नाराज झाल्यामुळे शिरोळेंच्या अडचणी आणखी वाढल्या. पुण्यासाठी छातीठोकपणे सांगता येईल असा कोणताही निर्णय त्यांच्या काळात झाला नाही. संसदेतील त्यांची कामगिरीही म्हणावी तशी नाही. पीआरएसच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले फक्त 208 प्रश्न उपस्थित केले. तर 18 चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. त्यांची संसदेतील हजेरी 93 टक्के होती. पण या उपस्थितीच्या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न उपस्थित केले नाही.

कार्यकर्त्यांचं पाठबळ नाही

कोणत्याही नेत्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांचं पाठबळ अत्यंत महत्त्वाचं असतं. पण अनिल शिरोळेंमागे कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ नाही. संघटन मजबूत करता न आल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही खासदारावर नाराज आहेत.

संबधित बातम्या : 

भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित

भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू

भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी

सांगलीतून भाजपची उमेदवारी जाहीर, संजयकाका म्हणतात…

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *