मोदी सरकारने विद्यार्थ्यांची ‘मन की बात’ ऐकावी, JEE-NEET परीक्षांवरुन राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकायला हवं आणि त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात, असं राहुल गांधी म्हणाले

मोदी सरकारने विद्यार्थ्यांची ‘मन की बात’ ऐकावी, JEE-NEET परीक्षांवरुन राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 23, 2020 | 3:51 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams) यांनी NEET आणि JEE परीक्षेवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकायला हवं आणि त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात, असं राहुल गांधी म्हणाले (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams).

NEET आणि JEE परीक्षेबाबत सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा

याप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट केलं. “आज आमचे लाखो विद्यार्थी सरकारला काही सांगू इच्छितात. सरकारने NEET, JEE परीक्षेबाबत त्यांचं म्हणणं ऐकायला हवं आणि सरकारने यावर काही अर्थपूर्ण तोडगा काढणे आवश्यक आहे”, असं ट्विट राहुल गांधींनी केलं.

राहुल गांधींपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आणि शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला विनंती केली होती की, NEET आणि JEE परीक्षेला आता रद्द करण्यात यावं.

“केंद्र सरकार NEET आणि JEE च्या नावावर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळ करत आहेत. केंद्राला माझी विनंती आहे की त्यांनी या दोन्ही परीक्षा तात्काळ रद्द कराव्या. यंदाच्या वर्षाच्या अ‍ॅडमिशनसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. या अभूतपूर्व संकटाच्या वेळी, एका अभूतपूर्व निर्णयानेच तोडगा निघेल”, असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams).

JEE-Main ची परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत आणि NEET ची परीक्षा 13 सप्टेंबरपर्यंत असेल, अशी घोषणा नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने केली होती.

राजकीय पक्षच नाही तर विद्यार्थीही या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. 3 मे रोजी होणाऱ्या या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या (Rahul Gandhi Tweeted About NEET And JEE Exams).

संबंधित बातम्या :

NEET JEE-Mains Exam Dates | ‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.