Eknath Shinde : राज्यपालांचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची सूचना

आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. त्यात बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी दिले आहेत.

Eknath Shinde : राज्यपालांचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची सूचना
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 3:40 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तसंच शिवसेनेच्या नेत्यांकडूनही धमकीवजा इशारा दिला जातोय. राज्यात विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहेत. अशावेळी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण (Security) पुरवण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. त्यात बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी दिले आहेत.

15 बंडखोर आमदारांना केंद्राची Y+ सुरक्षा

दरम्यान, काही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील बंडाळी मोडण्यासाठी शिवसैनिक कायदा हातात घेतली अशी एकंदरीत घटना आणि घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार ही धास्तावले आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावले आहे. त्यांनी तातडीने या 15 बंडोबांना वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. त्यामुळे आता या स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या आमदारांना तगडी सुरक्षा प्रदान केली आहे. त्यांनी या 15 आमदारांना Y+ सुरक्षा प्रदान केली आहे.

सुरक्षा काढल्याचा आरोप खोटा – गृहमंत्री

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांचं संरक्षण महाविकास आघाडी सरकारने काढल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. या आमदारांची कोणत्याही प्रकारची सुरक्षा काढलेली नाही, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. शनिवारी सकाळीच बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर केलं. यात महाविकास आघाडी सरकारने आमची आणि आमच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली आहे. केवळ राजकीय आकसापोटी असं राजकारण केलं जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. मात्र एकनाथ शिंदेंचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.