AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटील म्हणाले आमचा भाऊ पळवला, हसन मुश्रीफ म्हणतात…

भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फारच मनाला लावून घेतलं आहे. यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी," असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी (hasan mushrif criticizes chandrakant patil)  लगावला.

चंद्रकांत पाटील म्हणाले आमचा भाऊ पळवला, हसन मुश्रीफ म्हणतात...
| Updated on: Jan 16, 2020 | 4:49 PM
Share

कोल्हापूर : “विधानसभेत भाजपला बहुमत मिळाल्यानं शिवसेनेसोबत पुन्हा सत्ता स्थापन करत कारभार करण्याचे स्वप्न भाजपने पाहिले होते. मात्र हे स्वप्न पूर्ण झालं नाही. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फारच मनाला लावून घेतलं आहे. यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी,” असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी (hasan mushrif criticizes chandrakant patil)  लगावला.

काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा भाऊ पळवला या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेलाही मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. “भावाला वाटणी दिली नाही. त्याला मालमत्ता दिली नाही. तर तो वेगळा राहणारच. त्यालाही आता समजायला लागले आहे. तोही आता मोठा झाला आहे. त्याला तुम्ही संपत्तीत वाटा देत नाही. तर तो त्याची वेगळी चूल मांडणारच ना. यात कुठे बिघडलं. आता तर तो मालकच झाला आहे,” असा खोचक टोलाही मुश्रीफ यांनी पाटलांना लागवला.

“विधानसभेत तुम्हाला दुसऱ्याच्या जिल्ह्यात जावं लागलं. आता कसला राजकीय हिशोब मागता? असे प्रत्युत्तरही हसन मुश्रीफ यांनी दिलं. दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर संपत्तीवरुन टीका केली होती. यावर हिशोब जनता मागते आणि तो जनतेला आम्ही देतो. मी कोल्हापुरातील कागल विधानसभेतून पाच वेळा निवडून आलो आहे. आता मी यात कसला हिशोब द्यायचा,” असेही मुश्रीफ म्हणाले.

तसेच 2 व्हिलरवरुन फिरणारे हसन मुश्रीफ साखर कारखान्याचे मालक कसे झाले? या चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, “सरकारी साखर कारखान्यांना सरकारने बंदी आणली आहे. 40 टक्के पैसा देणारे लोक जर उभे राहिले, तर 60 टक्के कर्ज बँका देतात. त्यामुळे कोणीही कारखाना काढू शकतं. याबाबत माझी अनेकदा चौकशी झाल्यानंतर मी त्यावर खुलासे केले आहेत,” असे मुश्रीफ (hasan mushrif criticizes chandrakant patil)  म्हणाले.

“भाजपने गेल्या 5 वर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षांतर विरोधक तयार केले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना त्यांनी आधी संपवलं. त्यानंतर त्यांनी पक्षाला संपवलं,” अशी टीकाही मुश्रीफ यांनी केली.

“शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर त्यांचे काहीही ऐकायचे नाही. त्यांना सतत अपमानित करायचे. त्यांना 3 किंवा 4 नंबरची खाती द्यायची, ओढत न्यायचं आणि दिलेले आश्वासन पाळायचे नाही. विधानसभेच्या निवडणुकीत 40 च्या आत त्यांचे सदस्य कसे राहतील. असा जाणीवपूर्वक प्रयत्न कोल्हापुरात झाला,” असेही मुश्रीफ म्हणाले.

“विरोधकांना टार्गेट करायचं. त्यांना फोडून जेवढं आपल्या पक्षात घेता येईल, तेवढं घ्यायचं. आपल्या पक्षात घ्यायचं. इनकमिंग करायचं. त्यांना पद पैसा द्यायचा. जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे घालायचे. हे कर्नाटकातही घडलं. त्यामुळे जनतेला भाजप नको वाटायला लागली,” असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट (hasan mushrif criticizes chandrakant patil)  केले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.