VIDEO | आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही वेळ मिळेना, गाडीतच बसून राजेश टोपेंचा अल्पोपहार

राजेश टोपेंना वेळी-अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Rajesh Tope having Snacks in Car)

VIDEO | आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही वेळ मिळेना, गाडीतच बसून राजेश टोपेंचा अल्पोपहार
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 9:14 AM

औरंगाबाद : आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) महाराष्ट्राचे आरोग्य पुन्हा धडधाकट करण्याच्या मिशनवर आहेत. त्यामुळे टोपेंना आपल्या बिझी शेड्यूलमधून जेवणासाठीही वेळ मिळत नाही. औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा राजेश टोपे यांचा व्हिडीओ समोर आला आहे. (Health Minister Rajesh Tope having Snacks in Car at Aurangabad Airport Video Viral)

कोरोनाच्या संकट काळात राज्याची आरोग्य व्यवस्था सांभाळताना राजेश टोपेंच्या स्वतःच्या आरोग्याची मात्र हेळसांड होते की काय, अशी शंका कोणाच्याही मनात येईल. कारण टोपेंना वेळी-अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या राजेश टोपे यांनी औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. राजेश टोपे हे पर्याय नसल्याचंही सांगतात. त्यानंतर औरंगाबादहून ते मुंबईला विमानाने रवाना झाले. राजेश टोपे यांच्या या कर्तव्यतत्परतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ :

आईच्या निधनानंतर ताबडतोब सेवेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं 1 ऑगस्ट 2020 रोजी दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती असल्यामुळे राजेश टोपे यांनी संयमीपणे या दु:खाला पाठीमागे सारत कोरोनाविरोधाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम सुरु केलं होतं. आपल्या आईनेच कर्म करण्याची शिकवण दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

“आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय. माझे प्रेरणास्थान शरद पवार आहेत. ते सातत्याने काम करत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी ते लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकांना प्रोत्साहन देत आहेत. लोकांची भीती घालवत आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार कसा थांबणार? राजेश टोपेंनी सांगितला सरकारचा प्लॅन

गुजरातमधून महाराष्ट्रात रस्त्यांनी ऑक्सिजन टॅंकर आणणार, राजेश टोपेंची माहिती

(Health Minister Rajesh Tope having Snacks in Car at Aurangabad Airport Video Viral)

Non Stop LIVE Update
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.