जैतापूर प्रकल्पावरून राजकारण तापले; आम्ही स्थानिकांसोबत उदय सामंतांचे स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला

जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. आता यावरून राजकारण तापताना दिसत असून, शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही जनतेसोबत असल्याचे म्हटले आहे.

जैतापूर प्रकल्पावरून राजकारण तापले; आम्ही स्थानिकांसोबत उदय सामंतांचे स्पष्टीकरण, चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 1:40 PM

रत्नागिरी : जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. आता यावरून राजकारण तापताना दिसत असून, शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. जैतापूर प्रकल्पामुळे कोकणाला काय मिळणार हे पाहावं लागेल. शिवाय, आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. सामंत पुढे बोलताना म्हणाले की,  यापूर्वी देखील शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण, स्थानिकांच्या विरोधात जाऊन आम्ही निर्णय घेणार नाही. स्थानिकांचा निर्णय अंतिम असेल.

चंद्रकांत पाटलांना टोला

यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. दोन -तीन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपली जागा पक्षात पक्की राहावी यासाठी कदाचित ते बोलले असतील. मात्र पाटलांनी एक लक्षात ठेवावे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व धर्म समभाव होता. त्यांनी कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही असा टोलाही सामंत यांनी  यावेळी लगावला आहे.

भाजपाच्या भूमिकेचे स्वागत

त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये अशी मागणी केली जात असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. आम्ही देखील मंत्री मंडळच्या बैठकित तसा ठराव केला आहे. तसं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार निधी वाटपावरून राजकारण सुरू असल्याचे आरोप करण्यात येते होते. या आरोपाचे खंडन  उदय सामंत यांनी केले आहे. निधी वाटपावरून कोणासोबतही दुजाभाव केला जात नसून, समान पद्धतीने विकास निधीचे वाटप होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला निधी कमी पडू देणार नाही: अजित पवार

राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, पण निधी मिळण्यात सर्वात मागे; सर्वाधिक निधी कुणाला?

एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.