सुजय विखे पाटलांची संपत्ती किती?

अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण इथून भाजच्या तिकिटावर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील उभे आहेत, तर त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप रिंगणात आहेत. सुजय विखे पाटील यांनी काल (1 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्जासोबत …

सुजय विखे पाटलांची संपत्ती किती?

अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण इथून भाजच्या तिकिटावर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील उभे आहेत, तर त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप रिंगणात आहेत. सुजय विखे पाटील यांनी काल (1 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून सुजय विखेंची संपत्तीही समोर आली आहे.

डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत.  तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. पत्नीकडे मात्र प्रवरा बँकेचे 26 लाख 23 हजारांचे कर्ज आहे.

सुजय विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदविले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. सुजय यांच्याकडे 4 कोटी 91 लाखांची जंगम आणि 6 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

उमेदवारी अर्ज भरताना आई-वडिलांची अनुपस्थिती, सुजय विखे गहिवरले

गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी 68 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न घटून सुजय विखे यांचे वार्षिक उत्पन्न 86 लाख 10 हजार 202 इतके झाले आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 35 लाख 42 हजार इतके आहे. या दोघा पती-पत्नींवर एकही गुन्हा दाखल नाही.

सुजय विखे यांच्याकडे केवळ 1 लाख 16 हजार 295 रुपयांची रोकड आहे. पत्नीकडे 1 लाख 37 हजार 485 रुपये रोकड आहे. सुजय यांच्याकडे 3 कोटी 65 लाख 23 हजार 468, तर पत्नीकडे 1 कोटी 90 लाख 91 हजार 617 रुपयांच्या बँक खात्यातील ठेवी आहेत.

सुजय विखेंना ‘या’ अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!

सुजय यांच्याकडे 5 लाख 71 हजार 300 रुपयांचे आणि पत्नीकडे 67 हजार रुपयांचे शेअर्स गुंतवणूक आहेत. विखे यांची 16 लाख 65 हजार रुपयांची, तर पत्नीकडे 5 लाख 85 हजार रुपयांची विमा पॉलीसी आहे.

नगर दक्षिणचं राजकारण

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराला खिंडार पाडत, ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने विरोधकांना दणका दिला. विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना भाजपमध्ये घेऊन, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तिकीटही देण्यात आलं. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांची गोची झालीच, सोबत काँग्रेस-राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला. सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना उतरवण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीने एकप्रकारे मास्टरस्ट्रोक मारला असला, तरी सुजय विखेंविरोधात लढणं राष्ट्रवादीला आव्हानात्मक असेल. एकंदरीतच नगर दक्षिणची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *