AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात तिकीट वाटपात हुसेन दलवाई आणि विनायक राऊतांची सेटलमेंट : रमेश कदम

काँग्रेस खासदार हुसेन दलवाई (Congress Husain Dalwai) यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत  यांच्याशी (Shivsena Vinayak Raut) आर्थिक व्यवहार केला

कोकणात तिकीट वाटपात हुसेन दलवाई आणि विनायक राऊतांची सेटलमेंट : रमेश कदम
| Updated on: Sep 18, 2019 | 8:01 PM
Share

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसने (Congress) कमकुवत उमेदवार दिला होता. त्यामुळे काँग्रेस खासदार हुसेन दलवाई (Congress Husain Dalwai) यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत  यांच्याशी (Shivsena Vinayak Raut) आर्थिक व्यवहार केला आणि याच आर्थिक व्यवहारातून (Hussain Dalwai and Vinayak Raut settlement for konkan seat) सेटलमेंट केल्याचा आरोप चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने नवीनचंद्र बांदिवडेकर (Congress Navinchandra Bandivadekar) यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यांना कोणीही ओळखत नसून बांदिवडेकर यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूकही लढवली नव्हती. निवडणुकांपूर्वी बांदिवडेकर (Congress Navinchandra Bandivadekar) यांनी मतदानाच्या काही दिवस आधी प्रचार बंद केला आणि ते फोन बंद करुन बसले होते. विशेष म्हणजे प्रचाराच्या दिवसात त्यांनी फारसा प्रचारही केला नव्हता. तसेच मतदारसंघातील प्रत्येक बुथवर पक्षाच्या प्रचार साहित्यही पोचवले नव्हते असा आरोप माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी केला आहे.

त्यामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत चिपळूण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव विचारले असता, त्यांनी या ठिकाणी नवखा (Hussain Dalwai and Vinayak Raut settlement for konkan seat) उमेदवार दिल्याचे मान्य केले. त्यामुळे जिल्ह्यात प्रचार करताना काँग्रेसला अनेक ठिकाणी प्रचार करताना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच अनेक ठिकाणी प्रचारक साहित्यही देण्यात आले नव्हते हे मान्य केले आहे.

तर रमेश कदम यांनी केलेल्या या आरोपाबाबत मात्र वरिष्ठांना या प्रकाराची आपण तक्रार करणार आहोत. तसेच याबाबतची चौकशीची मागणी करणार असल्याचेही प्रशांत यादव यांनी सांगितले.

राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. असे असताना चिपळूणमध्ये काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्याबाबत झालेला आरोप आगामी काळात कोकणात मोठा भूकंप (Hussain Dalwai and Vinayak Raut settlement for konkan seat) होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.