मी अनेक चुका केल्या, पण बाळासाहेब पहाडासारखे माझ्या मागे उभे राहिले : संजय राऊत

मी सुद्धा सरकारच्या विरोधात लिहतो. माझ्यावर कुणाचा दबाव आला नाही. स्वातंत्र्य संघर्षातून मिळते," असेही राऊत (Sanjay raut Interview) म्हणाले.

मी अनेक चुका केल्या, पण बाळासाहेब पहाडासारखे माझ्या मागे उभे राहिले : संजय राऊत

बेळगाव : ” मी अनेक चुका केल्या. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहायचे. ते पहाडासारखे उभे राहायचे. त्यांच्यात दिलदारपणा होता. माझ्या अनेक चुका त्यांनी पोटात घेतल्या म्हणून माझा प्रवास झाला,” असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut Interview) म्हणाले.

“बाळासाहेब माझे हिरो होते. आजही आहेत. बाळासाहेबांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये पाठवलं. तिथं सर्व काम केली. अगदी पेपरचे गठ्ठे बांधले. बाळासाहेब सतत पाठीशी उभे राहायचे. मी अनेक चुका केल्या. पण ते पहाडासारखे उभे राहायचे. त्यांच्यात दिलदारपणा होता. माझ्या अनेक चुका त्यांनी पोटात घातल्या म्हणून माझा प्रवास झाला. ते मला जाहीररित्या फायरब्रँड संपादक असा उल्लेख करायचे,” असेही संजय राऊत  म्हणाले.

“मी माझं जीवन बाळासाहेबांना अर्पण केलं आहे. मी त्यांचा विचार घेतला. माझ्या नसानसात त्यांचा विचार आहे. बाळासाहेबांची भूमिका काय असू शकते हे मला कळायचे. बाळासाहेब ठाकरे चिडायचे, ही कॉम्प्लिमेंट असायची. तेवढं त्यांचं प्रेम ही होतं,” असेही राऊत म्हणाले.

“मी सुद्धा सरकारच्या विरोधात लिहतो. माझ्यावर कुणाचा दबाव आला नाही. स्वातंत्र्य संघर्षातून मिळते,” असेही राऊत (Sanjay raut Interview) म्हणाले.

संजय राऊत यांच्या हस्ते बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटन करण्यात आले. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी बेळगावमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती.

“बेळगाव महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा वाद आधीच्या राज्यकर्त्यांनी मिटवायला हवा होता. आता हे प्रकरण न्यायलयात आहे. पण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटायला हवा. उगाच एकमेकांची डोकी फुटायला नको. बाळासाहेबांनी दिलेली मराठी अस्मिता टिकायला हवी,” असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. बेळगावमधील प्रकट मुलाखतीत संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं.

“देशाच्या संसदेत आज बॅ. नाथ पै यांच्यासारखा संसदपटू दिसत नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनाही घाम फुटायचा. नाथ पै. ना ऐकायला सभागृहात नेहरू येत असतं. बेळगावची संस्था त्यांचं स्मरण ठेवते हे महत्वाचं,” असेही संजय राऊत म्हणाले.

“विचित्र परिस्थितीत मी इथे आलोय. मला बोलावे लागेल पण कायद्याच्या चौकटीत राहून बोलावे लागेल. भाषावार प्रांत रचना झाली तर भाषेभाषेत वाद असू नयेत,” असेही राऊत (Sanjay raut Interview) म्हणाले.

“मोठ्या प्रमाणात कानडी बांधव राहतात. मुंबईत शाळांना अनुदान देण्याचे काम आम्ही करतो. मुंबई, ठाणे कानडी माध्यम शाळा टिकाव्यात यासाठी अनुदान देतो. मदत करतो,” असेही संजय राऊत म्हणाले.

“कर्नाटकमधील कलावंत, साहित्यिक यांचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा संवाद उत्तम आहे. आम्ही शुध्द मराठीत संवाद साधतो. आमच्या मनात काही खोट नाही. वित्त भर जमिनीसाठी युद्ध नाही. दोन्ही बाजूने पांडव आहेत.” असेही संजय राऊत (Sanjay raut Interview) म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI