मी तसं बोललोच नव्हतो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला: जयंत पाटील

पंढरपूर येथील झालेल्या जाहीर सभेमध्ये समोरच्या गर्दीतील अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. | Jayant Patil coronavirus

मी तसं बोललोच नव्हतो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला: जयंत पाटील
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 9:46 AM

सांगली: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे सरकार चिंतेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचे एक वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले. तुमचे चेहरे पाहून कोरोना या जगातून गेला, असे मला वाटत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले होते. (Jayant Patil controversial statement in Pandharpur bypoll 2021)

मात्र, आता जयंत पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहे. पंढरपूर येथील झालेल्या जाहीर सभेमध्ये समोरच्या गर्दीतील अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. त्यावर मी इतकेच म्हणालो की, तुमच्याकडे बघून जगात कोरोना नाही असेच वाटते. मात्र असे करू नका. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. दुपारी तीन वाजता मंत्रि मंडळाची बैठक आहे त्यामध्ये लॉकडाऊन करायचे, कडक निर्बंध घालायचे याबाबत निर्णय होणार आहे, असे मी म्हटल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

मात्र, प्रसारमाध्यमांनी दिवसभर माझ्या पहिल्या दोन वाक्यांनाच जास्त प्रसिद्धी दिली. मी नंतर जे बोललो ते दाखवलेच नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्याबाबत गैरसमज निर्माण झाला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘आपलं सरकार आहे म्हणून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं’

जयंत पाटील यांनी रविवारी रांजणी येथील प्रचारसभेत जोरदार फटकेबाजी केली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे असा टोला जयंत पाटील यांनी यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाही, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे, अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली. संबंधित बातम्या:

भगीरथ भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ: जयंत पाटील

(Jayant Patil controversial statement in Pandharpur bypoll 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.