AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगीरथ भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ: जयंत पाटील

रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस हा विजय मिळवेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. | Pandharpur Bypoll

भगीरथ भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ: जयंत पाटील
jayant patil
| Updated on: Apr 04, 2021 | 3:48 PM
Share

पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. आज राज्यावर कोरोनाचं संकट आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आम्ही तिघेही एकदिलाने या संकटाचा सामना करत आहोत. या मतदारसंघातही आम्ही एकदिलाने लढतो आहे. त्यामुळे भगीरथचा (Bhagirath Bharat Bhalke) विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. (Bhagirath Bharat Bhalke will definitely win Pandharpur Bypoll election 2021 says Jayant Patil)

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा रांजणीतून शुभारंभ करण्यात आला. भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ मेहनत घेत आहे. रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस हा विजय मिळवेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आज भाजपने इथे उमेदवार दिला आहे. भारतनाना भालके विरोधी पक्षाचे आमदार होते तेव्हा भाजप सरकारने या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. 35 गावांचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील इतर प्रश्न असतील, नानांनी प्रत्येक वेळी भाजपशी संघर्ष केला याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

‘आपलं सरकार आहे म्हणून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं’

आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे असा टोला जयंत पाटील यांनी यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाही, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे, अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.

NIAचा तपास संथगतीने सुरु आहे: जयंत पाटील

महाराष्ट्र सरकार कसं अडचणीत येईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर तात्काळ या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढले असते. मात्र, तपास एनआयएकडे आहे. हा तपास संथगतीने सुरू आहे का, असा प्रश्न आता पडतोय. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे सरकार असल्या कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, ना आमच्या सरकारमध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जातील याची खात्रीही जयंत पाटील यांनी दिली.

(Bhagirath Bharat Bhalke will definitely win Pandharpur Bypoll election 2021 says Jayant Patil)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.