राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत जेपी नड्डांशी चर्चा झाली; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली नाही. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीचा प्रश्न लटकल्याची जोरदार चर्चा होती. (i have discuss with jp nadda about raj thackeray meeting, says chandrakant patil)

राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत जेपी नड्डांशी चर्चा झाली; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 7:19 PM

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली नाही. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीचा प्रश्न लटकल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, पक्षाचे संघटन प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची त्यांना माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. (i have discuss with jp nadda about raj thackeray meeting, says chandrakant patil)

चार दिवसांचा दिल्ली दौरा आटोपून आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांना दिली. राज यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे केंद्रीय नेतृत्वाला सांगितले. त्यावर आमच्या नेतृत्वाने ठिक है, एवढीच प्रतिक्रिया दिली. आमचे केंद्रीय नेते फार कमी बोलतात. आपल्या बोलण्यातून सिग्नल देईल एवढं सिंपल आमचं नेतृत्व नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

तर भेट नाकारली असती

संघटनेचे प्रमुख नड्डा, संघटन चालवणारे संतोष आहेत. त्यांची भेट झाली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मनसे भेटीमुळे रेड अॅलर्ट द्यायचा असता किंवा या भेटीमुळे ते माझ्यावर नाराज असते तर हे नेतेही मला भेटले नसते. नाराजी असती तर नितीन गडकरी, नड्डा आणि संतोषजींनी भेट नाकारली असती. गडकरी म्हणजे महाराष्ट्र आहे. गडकरींनी आम्हाला साग्रसंगीत जेवणही दिलं, असंही त्यांनी सांगितलं.

शहा-मोदींकडे आमचं कामच नव्हतं

यावेळी चंद्रकांतदादांनी अमित शहा यांच्यासोबत का भेट झाली नाही? यावरही सविस्तर विवेचन केलं. अमित शहा आणि मोदींची भेट झाली नाही. कारण त्यांच्याकडे आमचं काही काम नव्हतं. त्यांनाही आम्ही पत्रं दिलं होतं. 15 दिवस आधी या दौऱ्याची तयारी होती. अचानक दौरा झाला नाही. काही भूकंप होणार असं नाही. 15 दिवस आधी पत्रं गेली आणि वेळ मिळवण्यास सुरुवात झाली. आधी केवळ नड्डा आणि काही नेत्यांची भेट घेण्याचं ठरलं. शहा आणि मोदींच्या भेटीचं ठरलं नव्हतं. लोकसभा आणि राज्यसभा चालत नाही. त्यामुळे त्यांची टेन्शन असतात. आम्ही जाऊन फक्त नमस्कारच करणार होतो, त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा वेळ घेणं योग्य वाटलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

पण इकडे बातम्या सुरू झाल्या. शहांनी मला भेट नाकारली. शहा फडणवीसांना भेटले. पण मला भेटले नाहीत वगैरे वगैरे. देवेंद्र फडणवीस आठ दहा दिवसाने दिल्लीत जातात. आमच्याकडे विषय नव्हते. फडणवीस आणि शहांची भेट सुद्धा लोकसभेत झाली. इतकं शहांचं शेड्यूल टाईट होतं. त्यामुळे या दौऱ्याला उलटी दिशा देणं योग्य नाही. फडणवीसांना भेट दिली आणि मला नाकारली असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी ब्लँक एन्व्हल्पसारखा

भाजपचं राज्याचं प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्याकडे देण्यात येण्याची चर्चा आहे. अशावेळी ओबीसी नेत्यासाठी तुम्ही पद सोडण्यास तयार असाल का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, आमच्या पक्षात डोकं चालवायचं नसतं. फक्त काम करायचं असतं. वरच्या तीन चार लोकांना डोकं चालवायचं असतं. त्यांना वाटलं तर कोणी नाही म्हणत नाही. मी ब्लँक एन्व्हल्प सारखा आहे. त्यावर कधी सहकार मंत्री असा पत्ता लिहिला तर मी तिथे गेलो. कधी लिहिलं महसूल मंत्री तर तिथे गेलो. कधी लिहिलं प्रदेशाध्यक्ष तर तिथे गेलो. आता लिहिलं फलाना फलाना तर तिथेही जाईल. पण राज्यात ओबीसी नेतृत्वाची गरज आहे तर ओबीसी अध्यक्ष बनवा हे मी नेतृत्वाला सांगू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दर महिन्याला दिल्लीवारी

आमच्या नेत्यांवर जबाबदाऱ्या आहेत. पण कोविडमुळे त्यांना त्याला न्याय देता आला नाही. आता दर महिन्याला राज्यातील दोन नेत्यांनी दिल्लीत जावं अशी कल्पना आहे. जाताना दिल्लीत न्यायचे विषय घेऊन जावं. तीन दिवसाच्या खाली जायचं नाही. याचाच एक भाग म्हणून राम शिंदे या आठवड्यात पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. यातून कामेही मार्गी लागतील आणि तरुण नेत्यांचा कॉन्फिडन्सही वाढेल. वारंवार दिल्लीत गेल्या शिवाय दिल्लीबाबतचं कन्फर्ट तयार होत नाही, असंही ते म्हणाले.

कल्चरची वाट लावली

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या. त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. दारुच्या बाटल्या सापडणं गंभीर आहे. या घटनेची राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. कोविडच्या बंधनातून दारुच्या बाटल्या मंत्रालयात कशा गेल्या हा विषय नाही. हा कल्चरचा विषय आहे. मंदिरं बंद ठेवून दारूची दुकाने सुरू केली तिथेच कल्चरची वाट लावली. मंदिरांपेक्षा दारूंना महत्त्व प्राप्त झालं. ऑलरेडी गटारीच झाली आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला. (i have discuss with jp nadda about raj thackeray meeting, says chandrakant patil)

संबंधित बातम्या:

दिल्लीत चार दिवस राहूनही अमित शाहांची भेट नाही, नाकारली? चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

VIDEO: चंदनाचा पाट, सोन्याचं ताट दिलं, पण ताटात काहीच नाही, खायचं काय?; विनायक राऊतांचा केंद्रावर हल्ला

(i have discuss with jp nadda about raj thackeray meeting, says chandrakant patil)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.