… तरीही शिवसेना उमेदवाराचाच प्रचार करणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : समजा उद्या माझ्या पत्नीने जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली, तरीही मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात सुरु असलेल्या राजकीय चर्चांना पूर्ण विराम दिलाय. चंद्रकांत पाटील हे त्यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादीचे खासदार धनंडय महाडिक यांना येत्या निवडणुकीत मदत करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर चंद्रकांत […]

... तरीही शिवसेना उमेदवाराचाच प्रचार करणार : चंद्रकांत पाटील
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:19 PM

कोल्हापूर : समजा उद्या माझ्या पत्नीने जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली, तरीही मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात सुरु असलेल्या राजकीय चर्चांना पूर्ण विराम दिलाय. चंद्रकांत पाटील हे त्यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादीचे खासदार धनंडय महाडिक यांना येत्या निवडणुकीत मदत करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं.

वाचा – सतेज पाटलांच्या कोल्हापुरातील घरी राज ठाकरे

कागल तालुक्यातील मुरगुडच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. महाडिकांसोबतची मैत्री वगैरे बाजूला आहे. आधी युतीचा धर्म पाळणार. कोल्हापूरचा खासदार निवडून देऊन दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करायचंय, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. युतीची घोषणा होण्याअगोदर त्यांनी महाडिकांना मदत करण्याचे संकेत दिले होते.

युती होण्याअगोदर चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

शिवसेनेसोबत शंभर टक्के युती होईलच की नाही हे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही. तसंच उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे, किंवा त्यांचं मत बदलण्यासाठी मी काही जादूगार नाही. युतीसाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं 15 वर्ष सरकार होतं, तो वाईट काळ होता. हे आमचं मत बदललेलं नाही. ते पुन्हा सत्तेत येतील असं पाऊल उचलू नका. काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळी लढली तर आपण वेगळे लढू, ते वेगळे लढले तर आम्ही तुम्हाला आवाहनच करत नाही. तुम्हाला वाटतं ना वेगळेवेगळे लढू आणि नंतर एकत्र येऊ तर ठिकाय. मात्र ते एकत्र आले आणि आपण वेगवेगळं लढणं ही रिस्क आहे. म्हणून आम्ही म्हणतो त्यांनी विचार करावा’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें