AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देगलूर बिलोलीची जनता भाजप काँग्रेसला धूळ चारणार, वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोलेंना विश्वास

काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना देगलूर बिलोलीची जनता धूळ चारेल, असा विश्वास देगलूर बिलोली पोटनिवडणुकीचे वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी व्यक्त केलाय. 

देगलूर बिलोलीची जनता भाजप काँग्रेसला धूळ चारणार, वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोलेंना विश्वास
उत्तमराव इंगोले, वंचित उमेदवार
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 9:45 AM
Share

नांदेड : देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिलीय. देगलूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या इंगोले यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे इंगोले यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना चांगलाच घाम फुटणार आहे. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना देगलूर बिलोलीची जनता धूळ चारेल, असा विश्वास देगलूर बिलोली पोटनिवडणुकीचे वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी व्यक्त केलाय.

लोकसभेला काँग्रेस आणि भाजपला जसा नांदेडमध्ये आम्ही दणका दिला होता तसाच दणका आताही आम्ही देऊ. गेल्या अनेक वर्षांपासून मी मतदारसंघात काम करतोय. सेवेचं फळ मला तिकीटाच्या रुपात मिळालंय. आता उरलेलं काम जनता करेल. मला विश्वास आहे की काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना देगलूर बिलोलीची जनता धूळ चारेल, असा विश्वास देगलूक बिलोली पोटनिवडणुकीचे वंचितचे उमेदवार डॉ. उत्तमराव इंगोले यांनी व्यक्त केलाय.

गेल्या अनेक वर्षांपासून बिलोली-देगलूरमध्ये विकासाची गंगा वाहिलेली नाही. प्रस्थापितांकडून इथे फक्त राजकारण केलं जातं. पण आता जनतेला वंचितच्या रुपाने चांगला पर्याय आहे. जसा दणका लोकसभेला प्रस्थापितांना दिला तसाच दणका जनता आताही दोन्ही पक्षांना देईल आणि प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करुन वंचितला निवडून देईल, असा विश्वास डॉ. इंगोले यांनी व्यक्त केला.

वंचित आघाडीचा उमेदवार जाहीर

वंचित बहुजन आघाडीने पत्रक प्रसिद्ध करुन आपला उमेदवार घोषित केला. देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित करत आहोत. डॉ. उत्तम रामराव इंगोले यांना उमेदवारी देत आहोत, असं वंचित आघाडीने म्हटलं आहे.

उमेदवाराचे नाव -डॉ. उत्तम रामराव इंगोले

शिक्षण- एम.बी.बी.एस.,एम.डी. (भूलतज्ञ)

व्यवसाय – १८ वर्षापासून देगलूर मध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत.

नांदेड बिलोलीत आता तिरंगी लढत

भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. वंचितने डॉ. डॉ. उत्तमराव इंगोले यांना तिकीट दिलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा परिचय

डॉ. उत्तम रामराव इंगोले मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेसह सामाजिक कार्यात अग्रेसर असून फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून व संविधान जागरण समितीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सामाजिक विषयावर जागरण व आंदोलने केले आहेत. मागील दोन दशकांपासून सातत्याने सामाजिक योगदान देताना वैद्यकीय क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत रंजल्या गांजल्या यांच्या सेवेसाठी विशेषता ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी धन्वंतरी प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली आहे.

ग्रामीण भागात सर्पदंश याविषयी असलेले अज्ञान दूर करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. उत्तम इंगोले यांनी ग्रामीण भागात जागरणा बरोबरच सर्पदंशावर प्रभावी उपचार करून शेकडो ग्रामीण रुग्णाचे प्राण वाचवले आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवा जागृत करताना रक्तदान सारख्या अति महत्त्वाच्या विषयावर ही त्यांनी कार्य केले असून ग्रामीण भागात अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन महापुरुषांच्या जयंत्या व विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने त्यांनी आयोजित केले आहेत.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय हाकेला ओ देऊन डॉक्टर उत्तम इंगोले यांनी गत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी तन-मन-धनाने योगदान दिले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीतही पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून डॉक्टर इंगोले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. उच्चशिक्षित असलेल्या डॉ. इंगोले यांनी वैद्यकीय सोबतच सामाजिक योगदानही दिले आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी च्या विचारधारेची कास धरून वंचितांचा सत्तेतील सहभाग वाढला पाहिजे यासाठी कार्यतत्पर राहत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे.

(I will win Deglaur Biloli By Election says VBA Candidate Dr Uttamrao Ingole)

हे ही वाचा :

Deglur Biloli Bypoll : सेनेचा नाराज नेता भाजपचा उमेदवार, काँग्रेसचं तिकीट घरात, आता वंचितचा उमेदवार ठरला!

फडणवीसांनी नुकसानीची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला, देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.