IAS टॉपर शाह फैसल पॉलिटिकल एन्ट्री, नव्या पक्षाची घोषणा

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत देशात अव्वल क्रमांक मिळवणारा जम्मू-काश्मीरमधील आयएएस अधिकारी शाह फैसल आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनमा देत बाहेर पडले होते. राजीनामा दिल्यानंतर शाह फैसल आता नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. शाह आता राजकारणात उतरणार असल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वर्तुळात एक नवीन कलाटणी आली आहे. शाह फैसल यांनी राजीनामा दिल्यापासून अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरु […]

IAS टॉपर शाह फैसल पॉलिटिकल एन्ट्री, नव्या पक्षाची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत देशात अव्वल क्रमांक मिळवणारा जम्मू-काश्मीरमधील आयएएस अधिकारी शाह फैसल आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनमा देत बाहेर पडले होते. राजीनामा दिल्यानंतर शाह फैसल आता नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. शाह आता राजकारणात उतरणार असल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वर्तुळात एक नवीन कलाटणी आली आहे. शाह फैसल यांनी राजीनामा दिल्यापासून अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. शाह आता ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र शाह फैसल यांनी या सर्व चर्चावर पूर्णविराम देत त्यांनी नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली.

श्रीनगरमधील राजभाग येथे आज शाह फैसल यांनी नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली. शाह यांनी राजीनामा देत जम्मू-काश्मीर सरकारच्या ध्येय धोरणावर टीका केली आहे. सध्याची जम्मू-काश्मीरची अवस्था पाहून राजकारणात उतरण्याचा निर्णय फैसल यांनी घेतला. ‘जम्मू-काश्मीर अँड काश्मीर पिपल्स मुव्हमेंट’ असं फैसल यांच्या पक्षाच नाव असणार आहे.

फैसल 2009 बॅचचे यूपीएससी परीक्षेत अव्वल येणारे पहिले काश्मिरी होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही फैसल यांचे कौतुक केले होते. शाह फैसल यांना काश्मीरचा युथ आयकॉन मानले जाते. मात्र अनेकदा आपल्या काही वक्तव्यामुंळे शाह फैसल वादात अडकले आहेत. फैसल यांनी भारतात सतत होणाऱ्या बलात्काराव एक वादग्रस्त ट्विट केले होते त्यामुळे त्यांना नोटिस पाठवण्यात आली होती. त्यांनी भारताला रेपिस्तान म्हणून संबोधले होते.

दरम्यान, याआधीही असे अनेक आयएएस अधिकारी पदाचा राजीनामा देत राजकारणात आले आहेत. छत्तीसगडचे ओपी चौधरी यांनीही नुकतेच राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमधून विधानसभा निवडणूल लढवली होती. मात्र त्यांना त्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला.

Non Stop LIVE Update
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.