AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्याच दिवशी ‘फैसला ऑन द स्पॉट’, तुकाराम मुंढेंचा चार कर्मचाऱ्यांना दणका!

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नावाचाच एवढा दरारा आहे, की त्यांच्या बदलीची ऑर्डन निघाली आणि ते रुजू होण्यापूर्वीच नागपूर मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी वेळेत कार्यालयात यायला लागले. 

दुसऱ्याच दिवशी 'फैसला ऑन द स्पॉट', तुकाराम मुंढेंचा चार कर्मचाऱ्यांना दणका!
| Updated on: Jan 30, 2020 | 11:36 AM
Share

नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अॅक्शन मोडमध्ये आले (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) आहेत. नागपूर पालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी त्यांनी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला. कामात अनियमितता आढळल्यानं लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश, तुकाराम मुंढे  (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner)यांनी दिले. तुकाराम मुंढे यांनी रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली.

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नावाचाच एवढा दरारा आहे, की त्यांच्या बदलीची ऑर्डन निघाली आणि ते रुजू होण्यापूर्वीच नागपूर मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी वेळेत कार्यालयात यायला लागले.  मंगळवारपासून ते रुजू झाल्यानंतर तर अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धडकीच भरली. पहिल्याच बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांचा क्लास घेतला आणि काम न करणाऱ्यांना घरी जावं लागेल, असा इशारा दिला. तर दुसऱ्या दिवशी सहा बैठका घेत विकासकामांचा आढावा घेतला,  जनता दरबारही सुरु केला.

पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे पहिल्या दिवशी वेळेआधी 9:30 च्या ठोक्याला कार्यालयात आले. पहिल्याच बैठकीत त्यांनी काम न करणाऱ्यांना घरी जावं लागेल, अशा इशारा दिला. तर दुसऱ्या दिवशीही तुकाराम मुंढे वेळेपूर्वी 9:40 च्या ठोक्याला कार्यालयात दाखल झाले आणि दिवसभर तब्बल सहा बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला.

एकीककडे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. मनपाच्या उत्पन्नाच्या स्थितींची माहिती घेतली, शहरातील कचरा संकलाचीही माहिती त्यांनी घेतली आणि शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी कंत्राटदारांवर का नाही, याचा जाबही विचारला. एकीकडे कामांचा आढावा, तर दुसरीकडे जनतेशी जोडण्यासाठी, त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच जनता दरबार सुरु केला आणि जनतेच्या समस्या ऐकूण घेतल्या.
एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे, त्यांच्या आगमनानं नागपूर महानगरपालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धडकी भरलीय. चक्क तुकाराम मुंढे यांना मनपा मुख्यालयात आल्यावर सॅल्युट कसा मारायचा, याचं प्रशिक्षण वरिष्ठ सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घेतलं आणि मगच तुकाराम मुंढे यांना सॅल्युट करण्यात आला.
तुकाराम मुंढे यांच्या तावडीत सापडू नये म्हणून कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता तुकाराम मुंढे यांच्या आगमनानं बळ मिळालं आहे.

संबंधित बातम्या 

तुकाराम मुंढेंना सॅल्यूट कसा मारायचा? सीनियरकडून ज्युनिअरला प्रशिक्षण, वेळेआधीच मुंढे कार्यालयात

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.