भाजपशिवाय सरकार आल्यास तो जनतेचा अपमान : सुभाष देशमुख

भाजपशिवाय इतर कोणात्याही पक्षाची सत्ता आल्यास जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान होईल," असं वक्तव्य माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं (subhash deshmukh on bjp government formation) आहे

भाजपशिवाय सरकार आल्यास तो जनतेचा अपमान : सुभाष देशमुख

सोलापूर : “राज्यातील जनतेने भाजप शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला (subhash deshmukh on bjp government formation)  आहे. मात्र भाजपशिवाय इतर कोणात्याही पक्षाची सत्ता आल्यास जनतेने दिलेल्या कौलचा अपमान होईल,” असं वक्तव्य माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं (subhash deshmukh on bjp government formation) आहे. तसेच “राज्यात भाजपशिवाय कोणाचेही सरकार आल्यास ते सुरक्षित राहणार नाही,” असेही सुभाष देशमुख यांनी म्हटलं (subhash deshmukh on bjp government formation) आहे.

“राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपकडे सत्तास्थापनेसाठी विचारणा केली होती. मात्र, संख्याबळ कमी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुदतवाढ करण्याची विनंती केली. पण राज्यपालांनी मुदतवाढ दिली नाही,” अशी खंतही सुभाष देशमुख यांनी बोलून (subhash deshmukh on bjp government formation) दाखवली.

“एखाद्या राज्यात मोठा पक्ष सोडून दुसरं सरकार स्थापन होत असेल, तर हे सरकार महाराष्ट्राच्या दृष्टीने सुरक्षित राहील की नाही, हे महाराष्ट्राच्या मनात शंका निर्माण होण्यासारखं आहे. कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे”, असेही ते म्हणाले.

“भाजप सोडून महाराष्ट्रात सत्ता येणं हे महाराष्ट्रातील जनतेने भाजप-युतीला दिलेल्या कौलचा अपमान होईल,” असेही सुभाष देशमुख (subhash deshmukh on bjp government formation) म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्या संदर्भात दिल्लीत भेटीगाठी आणि बैठकांचं सत्र सुरु आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 27 दिवस उलटून गेले, तरीही सत्तास्थापन न झाल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार – संजय राऊत

अनेक दिवसांपासून खोळंबलेला सत्तास्थापनेचा प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात एक मजबूत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसंच उद्यापर्यंत (21 नोव्हेंबर) सत्तेचं चित्र स्पष्ट होईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचाही पुनरुच्चार केला.

संबंधित बातम्या : 

महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे

शरद पवार EXCLUSIVE : शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *