Uddhav Thackeray : असेल हिंमत तर मध्यावधी घेऊन दाखवा! भाजपला चॅलेंज देत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : सध्याच्या राजकीय घडामोडींवरही उद्धव ठाकरेंनी परखड विधान केलं.

Uddhav Thackeray : असेल हिंमत तर मध्यावधी घेऊन दाखवा! भाजपला चॅलेंज देत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 8:14 AM

मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) गेल्या पंधरा दिवसात ढवळून निघालंय. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) अख्खी शिवसेना फोडली. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कमालीचे सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता भाजपला थेट आव्हान दिलं आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केलीय. यानंतर उद्धव ठाकरेंना भाजपवर गंभीर आरोपही केलेत. असेल हिंमत तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. तसंच शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभरातील जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ते बोलत होते. खेळ करत बसण्यापेक्षा आपण जनतेच्या कोर्टात जाऊ असं ते म्हणालेत.

विधानसभेत मनमानी!

सध्याच्या राजकीय घडामोडींवरही उद्धव ठाकरेंनी परखड विधान केलं. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवती जात असून हा घटनेचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलंय. सध्या राज्यात जे सुरु आहे, ते घटनेला धरुन आहे की डॉ. आंबेडकरांनी बनवलेली घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे, या घटनातज्ज्ञांनी सांगावं, असंही ते म्हणाले.

शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांशी संवाद

शिवसेनेचे 40 आमदार फुटल्यानंतर शिवसेना आता पुन्हा नव्यानं उभी करण्याचं आव्हानं उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून बैठकांचं सत्र सुरु आहे. खासदार, आमदार, जिल्हाप्रमुखांसह स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वाचं संघटनात्मक धोरणांसाठी उद्धव ठाकरेंकडून बैठका घेतल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा

सोमवारी दादर येथील शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी लढायचं असेल, तर सोबत राहा असं उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना म्हटलंय. या बैठकीला शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ आणि रवींद्र मिर्लेकरही उपस्थित होते.

शरद पवारांनी व्यक्त केली मध्यवधींची शक्यता

दरम्यान, रविवारी बोलताना शरद पवारांनी महाराष्ट्रात गुजरातसोबतच मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली होती. संजय राऊत यांनीही याला दुजोरा दिला होता. तर दुसरीकडे मध्यावधी निवडणुकांची शक्यता भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावली होती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.