Imtiaz Jaleel: निदा खान प्रकरणात गुन्हा दाखल; इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, चार्जशीट पाहिल्यावरच…
Imtiaz Jaleel News: निदा खान प्रकरणातील गुन्ह्यानंतर इम्तियाज जलील यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे.

एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर इम्तियाज जलील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. निदा खान प्रकरणी बोलताना ते म्हणाले की, मला सहआरोपी केलं आहे अशी माहिती आहे. आज कोर्टात तारीख होती. आज चार्जशीट सबमिट होणार होती. मला अजून कॉपी मिळाली नाही. एक दोन दिवसात मी माहिती घेतो. माझं काय काय कनेक्शन आहे ते मी माहिती घेतो, असं ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील म्हणाले की, मी नाशिकला एकदा नाही तीनदा गेलो होतो. पोलिसांनी माझं वाईट सॅम्पल घेतलं माझा जवाब घेतला. मी मुंबईत भाषण केलं होतं. स्टेजवर मी भाषण केलं होतं. त्यावेळेस मी भाषण केलं होतं या मुलीबद्दल, ती रेकॉर्डिंग मला त्यांनी ऐकून दाखवली. मी त्यांना म्हटलं मला कशाला ऐकून दाखवत आहे. मी पब्लिकली बोललो होतो. त्यांनी त्याचं सुद्धा सॅम्पल घेतलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले की, मला त्यांनी बोलवलं होतं. मी स्टेटमेंट दिलं. व्हाईस सॅम्पल दिले. आता निष्पन्न काय झालं ते चार्टशीट पाहिल्यावर समजेल. मतीन पटेल माझा नगरसेवक आहे. 36 नगरसेवक मला संपर्क करतात. ज्यावेळेस निदा खान आणि त्यांच्या आई वडील आले होते तेव्हा संपर्क झाला. मात्र मतीनला माहित नव्हतं ते कोण होते. एवढे दिवस निदा खान घरी होती. पोलिसांनी तिला का अटक केली नाही? असा सवाल एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की,हे सगळं पॉलिटिकल आहे. एमआयएमचं नाव आलं की हे सगळं करायचं. भाजप आणि आरएसएसचा हा प्रयत्न आहे. मी स्वतः किंवा माझा पक्ष धर्मांतराच्या भानगडीत पडत नाही. आम्ही अशा गोष्टी करत नाही आम्ही त्यांच्या विरोधात आहे. या केसमध्ये काही नाही, एक अजेंडा घेऊन हे सुरू आहे. दिल्लीचे लोक आले होते. अजेंडा घेऊन महाराष्ट्रातील पत्रकार कमी होते. त्यात शहरात अशोक खरात यांचा प्रकरण झालं होतं. ते किती गंभीर होतं त्याच्यासाठी आले नव्हते.
