भारतातील पहिले राजकीय सेक्स स्कँडल की सर्वात मोठे राजकीय षड्यंत्र? काय होते ‘ऑपरेशन सुरेश राम’, ज्यामुळे नेत्याचे पंतप्रधानपद हुकले?
एक मोठी राजकीय खेळी असेच या सेक्स स्कँडलचे वर्णन करता येईल. 'ऑपरेशन सुरेश राम' या नावाची ही खेळी काय होती? काय होते 'ऑपरेशन सुरेश राम'? कोण होता तो राजकीय नेता, काय घडलं होते त्यावेळी? या प्रकरणात संजय गांधी यांचा हस्तक्षेप काय होता? या लेखामधून जाणून घेऊ सर्व इत्यंभूत माहिती...

कर्नाटक राज्यातील हसन लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स टेप प्रकरणामुळे देशात एकच खळबळ माजली. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते पुतणे. मात्र, प्रज्वल रेवन्ना यांच्या या कृत्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का बसला. प्रज्वल रेवन्ना प्रकरण हे आताचे असले तरी भारतात 1978 मध्ये झालेल्या पहिल्या राजकीय सेक्स स्कँडल घडले होते. या सेक्स स्कँडलमुळे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या नेत्याला तब्बल तीन दशके त्या पदापासून दुर रहावे लागले. तर, इंदिरा गांधी यांच्याकडे पंतप्रधानपद आले. खरे तर इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठीच खेळण्यात आलेली ही राजकीय खेळी होती असेच या सेक्स स्कँडलचे वर्णन करता येईल. ...
